सोमवार, ३० डिसेंबर, २०१९

कीड व्यवस्थापनात निबोळी अर्काचे महत्त्व





      कडुनिबाच्या बियामध्ये अनेक रासायनिक घटक असून त्यातील अझाडिरक्टीन, निबीन, निबीडीन, निबोनीन, निबीस्टेलाल, मेलट्रियाल हे महत्त्वाचे घटक आहेत. तसेच मित्र कीटकाचे आणि पर्यावरणाचे सवर्धन होते. त्यामुळे मित्र कीटकाद्वारे जविक कीड व्यवस्थापन होते.
निंबोळी अर्काचा किटकावर परिणाम
  • अंश: किंवा पूर्णपणे अंडी घालण्यात अयशस्वी
  • प्रौढाचा जीवनक्रम कालावधी कमी
  • अंडी घालण्यापासून मादी परावृत्त करतो
  • अंडी ऊबवण्यावर परिणाम
  • भक्षण रोधक
  • अळी अवस्थेतच कायम राहते
  • कात टाकण्यास प्रतिबंध

५ % निबोळी अर्क तयार करण्याची पद्धत
  • निंबोळीच्या बिया जमा करावे.
  • त्या वाळवून स्वच्छ करावे. वाळलेल्या बिया दळून त्यांची जाडसर भुकटी करून साठवून ठेवावे.
  • फवारणी करण्याच्या अगोदरच्या रात्री ५ किलो भुकटी कापडामध्ये बांधून १० लिटर पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावे.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी कापडातील निंबोळीच्या बियाच्या भुकटीतील अर्क पिळून काढावा.
  • त्यानंतर त्या अर्कात दुसरे ९० लिटर पाणी मिसळून % तीव्रतेचे एकूण १०० लिटरचे द्रावण तयार होईल.
  • हा निंबोळी अर्क पानावर योग्य रितीने पसरावा व टिकून राहावा, यासाठी 2०० ग्रॅम कपडे धुण्याचा सोडा किंवा साबण वरील द्रावणात मिसळून ढवळावा. त्यानंतर हे द्रावण फ़वारणीसाठी वापरावे.
वरीलप्रमाणे फ़वारणीसाठी १०० लिटरचे द्रावण तयार होते. फ़वारणीसाठी लागणारे एकूण द्रावण यानुसार निंबोळीच्या बियाच्या भुकटीचे पाण्याचे प्रमाण घ्यावे.

सोमवार, १६ डिसेंबर, २०१९


करडई : एकात्मिक व्यवस्थापन


मावा



किडीचे नाव
किडीची ओळख व नुकसानीचा प्रकार
एकात्मिक व्यवस्थापन
मावा
मावा अर्धगोलाकार आणि मृदू शरीराचा असून, शरीरावर पाठीमागच्या बाजूस दोन शिंगे असतात. माव्याची पिल्ले गडद तपकिरी रंगाचे असतात. प्रौढ मावा काळया रंगाचा असतो. पंख असलेल्या माव्याची जास्त संख्या प्रादुर्भाव होण्याच्या सुरुवातीस आणि पिकाच्या शेवटच्या अवस्थेत असते. मावा त्याच्या सोंडेव्दारे झाडातील अन्नरस शोषण करतो म्हणून झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होउन उत्पादनात लक्षणीय घट येते. याशिवाय मावा आपल्या शरीरातून साखरेसारखा चिकट पदार्थ बाहेर टाकतो.
  • हंगाम संपल्यानंतर शेतातील काडीकचरा वेचून नष्ट करावा. उन्हाळयात जमिनीची नांगरट करावी जेणेकरुन जमिनीतील किडींचा नाश होईल.
  • प्रतिकारक्षम वाणची पेरणी : पेरणीसाठी भीमा, कुसुमा, शारदा (बीएसएफ-१६८-४) किंवा पीबीएनएस-१२ या मावा व मर रोगास मध्यम प्रतिकारक्षम असलेल्या जातीचा वापर करावा.
  • करडईची पेरणी लवकर केल्यास (सप्टेबरच्या शेवटच्या आठवडयापासुन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयापर्यत) या पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो. पेरणीस जसाजसा उशीर होतो तसा माव्याचा प्रादुर्भाव वाढत जातो.
  • नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर करु नये.
  • टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी एचएएनपीव्ही २५० एल.ई प्रति हेक्टरी फवारणी करावी.
रासायनिक पध्दती
§  मावा : डायमिथोएट ३० ईसी १० मिली किंवा अॅसिफेट ७५ एसपी ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फ़वारावे.
घाटेअळी / बोंडअळी
पीक लहान असतांना अळया पाने व शेंडे खातात. बोंड धरल्यावर अळी त्याला छिद्र पाडून आतील दाणे खाते.
गुझीया सोंड
प्रौढ कीटक लहान भुंगे–या प्रमाणे असून त्यांना अखुड सोंड असते. त्याचा रंग काळपट अथवा मातीसारखा असतो. अळी तसेच सोंडे बी पेरणीनंतर बाहेर पडणारा अंकुर खातात. तसेच ही कीड रोपांच्या मुळांना इजा पोचविते आणि जमिनीलगतच्या रोपांचा भाग कातरुन टाकते. म्हणून रोपे वाळतात.
मोहरी : एकात्मिक व्यवस्थापन

मावा


काळी माशी


किडीचे नाव
किडीची ओळख व नुकसानीचा प्रकार
एकात्मिक व्यवस्थापन
मावा
प्रौढ तसेच बाल्यावस्थेतील मावा पाने, फांदया, फुले व रोपातील रस शोषण करतात. याशिवाय या किडीच्या शरीरातून गोड चिकट पदार्थ बाहेर टाकल्या जातो.  माव्याच्या प्रादुर्भावामुळे परागकण वांझ होतात. 
  • इमिडाक्लोप्रिड ७० ड्ब्ल्युएस ७ मिली प्रति किलो बियाणे बीजप्रक्रिया करावी.
  • मावा : डायमिथोएट ३० ईसी १३ मिली किंवा थायामिथॉक्झाम २५ ड्ब्ल्युजी १ ग्रॅम किंवाक्झीडीमेटॉन मिथाईल २५ ईसी २० मिली किंवा क्लोरपायरिफॉस २० ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फ़वारावे.
  • काळी माशी : डायमिथोएट ३० ईसी १३ मिली किंवा क्विनालफॉस २५ ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फ़वारावे.
  • पाने गुंडाळणारी अळी : डायमिथोएट ३० ईसी १३ मिली १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फ़वारावे.
काळी माशी
प्रौढ माशी काळया व नारंगी रंगाची असून तिचे पंख धुरकट असतात. अळी काळया रंगाची असते. अळया पिकाच्या पानामध्ये अनियमीत आकाराची छिद्रे पाडून खातात. 
पाने गुंडाळ्णारी अळी
अळी पाने गुंडाळून पानावर उपजिविका करते.

वाटाणा : एकात्मिक व्यवस्थापन


घाटेअळी


किडीचे नाव
किडीची ओळख व नुकसानीचा प्रकार
एकात्मिक व्यवस्थापन
पाने पोखरणारी अळी
अळया पानामध्ये शिˉन नागमोडी वळणाची पोखरण कˉन पानाचा हिरवा भाग खावुन टाकते.
  • पीक काढणीनंतर खोल नांगरट करावी.
  • पिकांचे अवशेष / धसकटे गोळा करुन नष्ट करावीत.
  • आजुबाजूच्या बांधावरील द्विदलवर्गीय तणांचा नाश करावा.
  • पिकांच्या फेरपालटीमध्ये बाजरी पिकास प्राधान्य द्यावे.
  • वाटाण्याच्या बियाण्यामध्ये हेक्टरी १०० ग्रॅम प्रमाणे लवकर येणा­–या  जातींचे ज्वारीचे बियाणे मिसळून पेरणी करावी, जेणेकरून त्याचा पक्षीथांबे म्हणून उपयोग होईल.
  • पाने पोखरणारी अळीसाठी मोनोक्रोटोफॉस ३६ एसएल किंवा २० मिली व घाटेअळीसाठी मिथोमिल ४० एसपी १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फ़वारावे.
घाटेअळी

अळी पोपटी रंगाची असली तरी विविध रंगछटा असलेल्या अळयाही दृष्टीस पडतात. त्याच्या शरीराच्या बाजुवर तुटक तुटक रंगाच्या उभ्या रेषा आढळतात. अळी कोवळी पाने, कळया, फुले कुरतडून खाते.  शेंगामध्ये शिरून एका शेंगेतील एक दोन दाणे फस्त करते.
मावा
कोवळया पानातील व शेंडयातील रस शोषण करतात.  झाडे पिवळी पडतात व झाडाच्या वाढीवर विपरित परिणाम होतो.


हरभरा : एकात्मिक व्यवस्थापन



घाटे अळी

जमिनीलगत खोड कुरतडणारी अळी


किडीचे नाव
किडीची ओळख व नुकसानीचा प्रकार
एकात्मिक व्यवस्थापन
घाटे अळी
हरभरा पिकाशिवाय कापूस, हरभरा, सोयाबीन, वाटाणा, मूग, उडीद, सूर्यफुल, करडई, ज्वारी, टोमॅटो, भेंडी इत्यादी पिकांना नुकसान पोहचविते. हरभ­यावर लहान लहान अळया सुरुवातीला कोवळी पाने, कळया व फुले कुरतडून खातात. शेवटी घाटे लागल्यानंतर अळया घाटे कुरतडून त्यास छिद्र पाडून डोके आत खुपसून आतील दाणे खातात.
मशागतीय पध्दती
  • उन्हाळयात जमिनीची खेाल नांगरट करावी.
  • आंतरपिक अथवा मिश्रपिक अथवा शेताच्या सभोवताली दोन ओळी जवस, कोथिंबीर किंवा मोहरी या  पिकाची लागवड करावी.
  • मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.
  • शेत तणविरहीत ठेवावे.
यांत्रिक पध्दती
  • पिकावरील मोठया अळया वेचून त्यांचा नाश करावा.
  • इंग्रजी टीअक्षराच्या आकाराचे ५० पक्षी थांबे प्रति हे. लावावेत.
  • घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.
जैविक पध्दती
  • ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • घाटे अळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. ५०० एल. ई. विषाणूची प्रति हे. फवारणी करावी.
रासायनिक पध्दती
  • घाटेअळी : क्विनालफॉस २५ ईसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ एसजी ४ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एससी 3 मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फ़वारावे.
  • जमिनीलगत रोप कुरतडणारी अळी : क्लोरपायरिफॉस २० ईसी २० मिली प्रति १० लि. पाण्यात मिसळुन खोडाभोवती आळवणी करावी.
जमिनीलगत खोड कुरतडणारी अळी
अळया काळपट तपकिरी रंगाच्या असतात. अळयांना स्पर्श करताच अंग आखडून घेतात व गोलाकार होतात. प्रौढ पतंग २५ मि.मी. लांब असून त्याचे पुढील पंख तपकिरी रंगाचे तर मागील पंख पांढरट रंगाचे असतात. हा किडीची अळी निशाचर असते, त्यामुळे ती दिवसा जमिनीत राहते व रात्री बाहेर येऊन जमिनीलगत रोपांना कुरतडते. तसेच अळी पानावरही उपजीवीका करते.


रबी ज्वारी व गव्हावरील खोडमाशीचे व्यवस्थापन


      रबी हगामातील ज्वारी व गहू पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. ही कीड महत्वाची व गंभीर असून वेळीच उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
ओळख : ही कीड घरमाशीप्रमाणे परंतु आकाराने लहान असते. खोडमाशी रंगाने काळपट राखाडी रंगाची असून तिच्या पृष्ठभागावर खालच्या बाजूने ४ ते ५ ठिपके असतात. अंडी पाढरी, चपटी व लांबट आकाराची असतात. पूर्ण वाढ झालेली अळी १० ते १२ मि.मी. लांबीची असून ती तोंडाकडे निमुळती असते. तिचा रंग पिवळसर असतो व तिला पाय नसतात. कोष तपकिरी रगाचे असतात.

अळी

अंडी

नुकसानीचा प्रकार : हया किडीचा प्रादुर्भाव फक्त रोपावस्थेतच आढळून येतो. अंडयातून निघालेली अळी रोपाच्या बुडापर्यंत जाऊन खोडाला छिद्र पाडते व आत शिरुन वाढणा­या पोंग्यावर उपजिवीका करते. त्यामुळे सुरुवातीला मधला वाढणारा रोपाचा भाग पिवळसर पडणे व नंतर तो मरून जातो यालाच पोंगेमर असे म्हणतात. लहान रोपे या किडीच्या प्रादुर्भावामुळे पूर्णत: मरून जातात तर मोठया रोपांना बाजूने फुटवे फुटून उत्पादनात घट येते. हया किडीचा प्रादुर्भाव उशिरा पेरणी झालेल्या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळून येतो तर ढगाळ वातावरणामुळे बागायती क्षेत्रात हया किडीची वाढ छपाटयाने झालेली आढळून येते. ज्वारी, बाजरी, मका, गहू व इतर तृणधान्ये तसेच काही तृणवर्गीय गवतावर ही कीड उपजिवीका करते.



जीवनक्रम : हया किडीच्या अंडी, अळी, कोष व प्रौढ माशी अशा एकूण चार अवस्था असतात.  प्रौढ मादी माशी तिच्या एक महिन्याच्या जिवनक्रमात पानाच्या खालच्या बाजूस किंवा लहान रोपाच्या नवीन खोडावर एकएकटी अशी एकूण ४० ते ५० अंडी घालते. २ ते ३ दिवसांनी अंडयातून पांढुरक्या रंगाची अळी बाहेर पडते व ती तिचा १० ते १२ दिवसांचा जीवनक्रम खोडाच्या आत उपजिवीका करून पूर्ण करते व अशी पूर्ण वाढ झालेली अळी खोडामध्ये किंवा खोडाबाहेर येऊन जमिनीत कोषावस्थेत जाते. कोषावस्था एक आठवडयाची असते. एक आठवडयांनी कोषातून प्रौढ माशी बाहेर पडते व मिलनानंतर ती अंडे द्यायला सुरुवात करते. अशाप्रकारे एक माशी तिची एक पिढी एकूण २ ते ३ आठवडयात पूर्ण करते व अशा कित्येक पिढया एका वर्षात तयार होतात. या किडीमध्ये अळी व कोष हया सुप्तावस्था असतात, त्या कडब्यामध्ये आढळून येतात.


एकात्मिक कीड व्यवस्थापन
  • पिकाची कापणी झाल्यावर शेताची नांगरणी करून व त्यातील धसकटे गोळा करुन नष्ट करावीत म्हणजे त्यामधील सुप्तावस्थेतील अळयांचा नाश होईल.
  • पेरणी वेळेवर करावी, पेरणीस उशिर झाल्यास बियाण्याचे प्रमाण वाढवावे.
  • पिकाची फ़ेरपालट करावी.
  • कोळ्पणी व खुरपणी वेळेवर करावी, त्यामुळे जमिनीतील कोष नष्ट होतील.
  • ५ % निंबोळी अर्काची फ़वारणी करावी.
  • ज्वारीवरील शिफ़ारस केलेली कीटकनाशके
  • इमिडाक्लोप्रीड  ७० ड्ब्ल्युएस १० मिली किंवा इमिडाक्लोप्रीड  ४८ एफ़एस १२ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड  ७० ड्ब्ल्युएस १० मिली किंवा थायामिथॉक्झाम ३० एफ़एस १० मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  • क्विनालफॉस २५ ईसी ३० मिली किंवाक्झीडीमेटॉन मिथाईल २५ ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फ़वारावे.
  • गव्हावरील शिफ़ारस केलेली कीटकनाशके
  • सायपरमेथ्रिन १० ईसी ११ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फ़वारावे. किंवा
  • जमिनीत ओल असल्यास फ़ोरेट १० सीजी हे दाणेदार कीटकनाशक १८.७५ किलो/हे. जमिनीत मिसळावे.

      अशाप्रकारे वेळेवर योग्य उपाययोजना केल्यास खोडमाशीचे चागल्याप्रकारे व्यवस्थापन होईल.

पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन