शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

लिंबुवर्गीय पिकावरील कोळी किडीचे व्यवस्थापन Citrus mite management


      लिंबुवर्गीय फळपिकावर जगभरात ८२३ आणि भारतामध्ये जवळपास २५० किडींची नोंद झाली आहे. यापैकी कोळी या अकिटकवर्गीय किडीचा प्रादुर्भाव अलीकडे विशेष करून मोसंबी व संत्रा फळपिकावर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. लाल्या कोळी (Rust mite) व हिरवे कोळी (Green mite) या दोन प्रजातीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.

लाल्या कोळी (रस्ट कोळी)

ओळख : प्रौढ अति सुक्ष्म, लांबट, मध्यभागी फ़ुगीर व पाठ चपटी असून पिवळ्या रंगाचे असतात. पिल्ले (अळ्या) प्रौढासारखीच दिसतात, परंतु फिकट पिवळसर रंगाचे असतात. अंडी गुळगुळीत, गोलाकार व अर्ध पारदर्शक असतात.

नुकसानीचा प्रकार : प्रौढ व पिल्ले फळाच्या सालीतून रस शोषण करतात. त्यामुळे फळाच्या सालीवर तपकिरी किंवा जांभळे चट्टे दिसू लागतात. यालाच लाल्या किंवा मंगु असेही म्हणतात. मार्च-एप्रिल मध्ये अंबिया बहाराच्या आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मृग बहाराच्या फळावरील प्रादुर्भावामुळे फळांना बाजारात कमी भाव मिळतो.

जीवनक्रम : प्रौढ मादी फळाच्या सालीवरील खाच किंवा खळग्यामध्ये व पानाच्या मागच्या बाजूला पुंजक्यात अंडी घालते. एक मादी एकूण २०-३० अंडी घालते. अंडी अवस्था ३ दिवस असते. त्यातून निघालेली पिल्ले (अळ्या) २-११ दिवसात वाढूतात. एक जीवनक्रम उन्हाळ्यात ७-१० दिवस व हिवाळ्यात १४ दिवसात पूर्ण होतो.

हिरवे कोळी

ओळख : ही कीड सुक्ष्म असून या किडीस बघण्यासाठी भिंगाची गरज आहे. ही फिकट हिरव्या रंगाचे असून पायाच्या चार जोडया असतात.

नुकसानीचा प्रकार : प्रौढ व पिल्ले पाने व फळातील रस शोषण करतात. त्यामुळे पान व फळावर पांढरे ठिपके दिसतात.

 





व्यवस्थापन

  • पाण्याचा ताण पडल्यास कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे बागेत पाण्याचा ताण विशेष करून उन्हाळा व हिवाळ्यात पडू देऊ नये. 
  • प्रादुर्भाव दिसताच डायकोफॉल १८.५ % ईसी २७ मिली किंवा डायफेनथ्यूरॉन ५० % डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ % एसएल १२.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन