शनिवार, २० फेब्रुवारी, २०२१

उन्हाळी भुईमूग व तीळ पिकावरील किडींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन

 

      सध्या उन्हाळी हंगामामध्ये भुईमूग व तीळ या पिकाची लागवड शेतकऱ्यानी केली आहे. या पिकावर विविध किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना कमी उत्पादन मिळते. यासठी किडीडचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

 

भुईमूग


भुईमुगावरील प्रमुख किडी : पाने पोखरणारी अळी, तंबाखुवरील पाने खाणारी अळी, मावा, फुलकीडे, तुडतुडे, वाळवी

 पाने पोखरणारी अळी : ही कीड भुईमूगाशिवाय सोयाबीन पीक आणि बावची तणावर आढळते. लहान अळी पानाच्या वरच्या बाजूने पान पोखरुन आत शिरते. आठवडाभर आत राहून बाहेर निघते व पानावर कप्पा बनवून त्यात राहते. जेव्हा अळी मोठी होते ती जवळपासची पाने एकत्र करुन गुंडाळून त्यात राहून पानावर उपजिवीका करते. मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास झाडाची वाढ खुंटते, पाने तपकिरी पडून पीक जळाल्यासारखे दिसते.

तंबाखुवरील पाने खाणारी अळी : लहान अळया समुहाने पानाच्या मागचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पाने जाळीदार व कागदासारखी हेातात व त्यावर किडीच्या विष्ठेचे कण दिसतात. मोठया अळया रात्रीच्या वेळी एकएकटया पाने व कोवळे शेंडे खातात आणि जमिनीलगतच्या फांदया कातरतात.

मावा : मावा मृदु शरीराचा रंगाने हिरवट काळा असून त्याच्या शरीरावर मागील बाजूस दोन शिंगे असतात. मावा हा भुईमूगाचे शेंडे, फुले व पानातून रस शोषण करतो. तसेच मावा शरीरातून चिकट व गोड द्राव झाडावर टाकतो व त्यावर काळया बुरशीची वाढ होवून पानातील प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते.

फुलकीडे : फुलकिडे सुक्ष्म, फिकट पिवळया रंगाची असतात. फुलकिडे झाडांच्या शेंडयावर विशेषत: न उमगलेल्या पानात व फुलात आढळतात. ते पानाचा पृष्ठभाग खरवडून निघणारा अन्नरस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या वरील भागावर फिकट पिवळसर तर खालील बाजूवर तांबडे चट्टे पडतात. पाने कोमेजलेली व निस्तेज दिसतात. फुलकिडयाची थ्रिप्स पामी ही प्रजाती बड नेक्रोसीस या रोगाच्या विषाणूचा प्रसार करते.

तुडतुडे : तुडतुडे साधारणपणे पाचरीच्या आकाराचे व फिकट हिरव्या रंगाचे असतात. ते नेहमी तिरके चालतात. प्रौढ आणि पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने राहून त्यातील रस शोषण करतात. अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात.

वाळवी  : वाळवी पिकाच्या मुळा व खोड कुरतडते, त्यामुळे झाड सुकून वाळून जाते. तसेच हि वाळवी शेंगा पोखरून आतील बिया खाते.

 

एकात्मिक कीड व्यवस्थापन

मशागतीय पध्दती

  • जमिनीची खोल नांगरट करुन काडी कचरा, वेचून नष्ट करावा.
  • खरिपामध्ये पेरणी जूनच्या पहिल्या पंधरवाडयात करावी.
  • ज्वारी, तूर, मका, बाजरी ही आंतर पिके घ्यावीत.
  • पिकाभोवती एरंडी हे सापळा पीक म्हणून लावावे.

यांत्रिकी पध्दती

  • पुंजक्यातील अंडी व लहान अळया हाताने वेचून नष्ट कराव्यात.
  • तंबाखुवरील पाने खाणारी अळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.
  • पक्षांना बसण्यासाठी १० ते १२ पक्षीथांबे प्रति हेक्टरी लावावेत.

जैविक पध्दती

  • ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
  • तंबाखुवरील पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसताच एसएलएनपीव्ही विषाणू २५० एल ई/ हेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
  • ट्रायकोग्रामा चिलोनीस (५०,००० अंडी/हेक्टरी) या परोपजीवी किटकांचा वापर करावा.

रासायनिक पध्दती

 

कीड

कीटकनाशके

प्रमाण / १० लि. पाणी

पाने पोखरणारी अळी

क्विनलफॉस २५ ईसी किंवा

२४ मिली

क्झीडीमेटॉन मिथाईल २५ ईसी किंवा

२० मिली

डेल्टामेथ्रिन २.८ ईसी किंवा

१० मिली

लॅमडा साहॅलोथ्रिन ५ ईसी

६ मिली

तंबाखुवरील पाने खाणरी अळी

फ्ल्युबेन्डामाईड २० डब्ल्यूजी किंवा

६ ग्रॅम

मिथोमिल ४० एसपी किंवा

१५ ग्रॅम

नोव्हाल्यूरॉन ५.२५ % + इन्डॉक्झाकार्ब ४.५ % एससी किंवा

१७ मिली

थायामिथॉक्झाम १२.६ % + लॅम्बडा-साहालोथ्रीन ९.५ % झेडसी

३ मिली

मावा, फ़ुलकिडे

इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल किंवा

२ मिली

क्विनालफॉस २५ ईसी किंवा

२० मिली

क्झीडीमेटॉन मिथाईल २५ ईसी किंवा

२० मिली

लॅमडा साहॅलोथ्रिन ५ ईसी

६ मिली

तुडतुडे

थायामिथॉक्झाम १२.६ % + लॅम्बडा-साहालोथ्रीन ९.५ % झेडसी

३ मिली

वाळवी

थायामिथॉक्झाम ०.९ % + फिप्रोनील ०.२ % जीआर

१०.६ - १२.१५ किलो / हे.

  • रील प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे.

 

तीळ


तिळावरील प्रमुख किडी : पाने गुंडाळणारी अळी, सोट अळी, गाद माशी, तुडतुडे

पाने गुंडाळणारी अळी : अळी अवस्था फिक्कट हिरव्या रंगाची असते. अळी शेंडयाकडील पाने एकत्र गुंडाळते व कोवळा शेंडा पोखरून त्यावर उपजीवीका करते. बीजकोष लागणाच्या अवस्थेमध्ये अळी फुले व कोवळी बीजकोष पोखरुन खातात.

सोट अळी : अळी मजबूत, हिरव्या रंगाची असून शरीरावर तिरकस पिवळया रंगाच्या पट्टा असतात व शरिराच्या मागच्या टोकाला वरच्या बाजूस शिंगा सारखे अवयव असते. अळी तीळाची पाने अधाशाप्रमाणे खाते व झाडाची पूर्ण पाने खाते.   

गाद माशी : अळी पांढ­या रंगाची असून फुलांमध्ये आढळते. अळी अंडकोषावर उपजिवीका करते, त्यामुळे शेंगा वेडयावाकडया होतात व दाणे व्यवस्थीत भरत नाहीत. फुलांवर व कोवळया शेंगावर गाद आल्यासारखी दिसते.

तुडतुडे : पिल्ले व प्रौढ सहसा पानाच्या खालच्या पृष्ठभागावर राहून पेशींमधील रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त पाने पिवळसर आणि चुरडल्यासारखी वाटतात.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

  • पाने गुंडाळणा­या किडीस प्रतिकारक्षम जाती उदा. ई ४७, ५७, ८४, १०५, १०६ आणि १५६ जातींची लागवड करावी.
  • सोट अळया जमा करून नष्ट कराव्यात.
  • ५ टक्के निंबोळी अर्काची फ़वारणी करावी.
  • पाने गुंडाळणारी अळी/ सोट अळी : क्विनालफॉस २५ ईसी २० मिली १० लिटर पाण्यात मिसळुन फ़वारावे.
  • तुड्तुडे : क्विनालफॉस २५ ईसी २० मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल २५ ईसी २४ मिली १० लिटर पाण्यात मिसळुन फ़वारावे.

 

पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन