शनिवार, १५ जून, २०१९


मका पिकावरील नवीन लष्करी अळी


  • मका पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
  • इंग्रजी नाव : Fall armyworm
  • शास्त्रीय नाव : Spodoptera frugiperda
  • आशिया खंडामध्ये सर्वप्रथम भारतामध्ये मे २०१८ मध्ये दक्षिण कर्नाटकातील जिल्हयामध्ये मका पिकावर या लष्करी अळीची नोंद झाली आहे.
  • महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरमध्ये या किडीचा मक्यावर मोठया प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आहे.
  • ही कीड नवीन असल्यामुळे आपल्या देशामध्ये या किडीविषयी संशोधनाला सुरुवात झाली आहे. परंतु इतर देशातील संशोधनाचा अभ्यास करुन प्रस्तुत लेखामध्ये या नवीन लष्करी अळीबद्दल माहीती दिली आहे.

किडीचे उगमस्थान व प्रसार
  • या किडीचे मुळस्थान संयुक्त संस्थाने ते अर्जेन्टीना या उत्तर व दक्षिण अमेरिका खंडातील देशामध्ये आहे.
  • २०१५ पर्यंत अमेरिका खंडातील देशाशिवाय इतर कोणत्याही खंडातील देशामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला नव्हता.
  • परंतु आफ्रीका खंडातील नाजेरिया, बेनीन आणि टोगो येथे २०१६ आणि घाना येथे २०१७ मध्ये या लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आढळून आला. आफ़्रिकेनंतर युरोपमध्ये प्रसार झाला.
  • सध्या या किडीची नोद चीन व पूर्व आशिया खडातील देशामध्येदेखील झाली आहे.

खाद्य वनस्पती
  • ही बहुभक्षी कीड आहे. ही कीड १८६ च्यावर तृणधान्ये, तेलवर्गीय, भाजीपाला पिके, गवत इत्यादीवर उपजिविका करते.
  • ही कीड प्रामुख्याने मका, भात, ज्वारी, ऊस व बर्म्युडा गवत यावर प्रामुख्याने प्रादुर्भाव करते.
  • याशिवाय सोयाबीन, कापूस, भुईमुग, कांदा, टोमॅटो, कोबीवर्गीय भाजीपाला, भोपळावर्गीय भाजीपाला इत्यादी पिकावर उपजिवीका करते.

विशेष लक्ष देण्याची गरज का आहे?
  • बहुभक्षी (१८६ च्या वर वनस्पतीवर उपजिविका). मका, ज्वारी, ऊस, भात, गहू इत्यादी तृणधान्ये पिकांना प्राधान्य. चवळी, भुईमूग, सोयाबीन, कापूस, बटाटा यावरर्ही नोंद आहे.
  • प्रसार होण्याचा वेग खूप जास्त (पतंग अंडी देण्याअगोदर ५०० किमीपर्यंत जाऊ शकतात. एका रात्रीत पतंग १०० कि.मी. प्रवास करु शकतो. वायाचा वेग अनुकुल असल्यास ३० तासात १६०० किमीपर्यंत गेल्याची नोंद आहे).
  • वर्षभर जीवनचक्र चालू असते. या किडीच्या जीवनक्रमात सुप्तावस्था नाही.

ओळख
  • पतंग : नर पतंगाचे समोरचे पंख करडया व तपकिरी रंगाचे असून पंखाच्या टोकाकडे व मध्यभागी पांढरे ठिपके असतात. मादी पतंगाचे समोरचे पंख पूर्णपणे करड्या रंगाचे असतात. नर-मादी पतंगाचे मागील पंख चमकदार पांढरी असतात. पतंग निशाचर असून संध्याकाळी मिलनासाठी जास्त सक्रीय असतात.


                                      मादी
 
 




  

                                         नर
 
 



  • अंडी : अंडी पुंजक्यात घातली जातात. अंडी घुमटाच्या आकाराची, मळकट पांढरी ते करडया रंगाची असतात. ही  अंडीपुंज केसाळ आवरणाने झाकलेली असतात.






  • अळी : पूर्ण वाढलेली अळी ३.१ ते ३.८ सें.मी. लांब असते. अळीचा रंग फिकट हिरवा ते जवळपास काळा असतो. पाठीवर फिकट पिवळया रंगाच्या तीन रेषा असतात. डोक्यावर उलटया इंग्रजी Y अक्षरासारखे चिन्ह असते तर कडेने लालसर तपकिरी पट्टा असतो. तसेच शरीरावर काळे ठिपके असतात. मागच्या बाजुने दुसया वलयावर चौरसाच्या आकारात चार काळे ठिपके असतात.


  • कोष : कोष सुरुवातीला हिरवट असून नंतर लालसर तपकिरी रंगाचे असतात.


जीवनक्रम
  • मादी पतंग पानावर पुंजक्यामध्ये अंडी घालते. एका पुंजक्यात १०० ते २०० अंडी असतात. एक मादी ८०० ते १२०० अंडी घालते. अंडयातून २ ते ३ दिवसात अळया बाहेर निघतात. अळीची वाढ १४ ते ३० दिवसात पूर्ण होते व जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. कोषावस्था ९ ते १२ दिवसाची  असते. पतंग जवळपास ७ ते १२ दिवस जगतात. अशाप्रकारे ३२ ते ४६ दिवसामध्ये एक जीवनक्रम पूर्ण होतो.
  • मोठ्या पाऊस आणि ढगाळ हवामान सतत एक आठवड्यापेक्षा जास्त असल्यास ही कीड मोठ्या प्रमाणात वाढते.

नुकसानीचा प्रकार

  • लष्करी अळीचा प्रादुर्भाव मका पिकावर सर्व अवस्थेत आढळून येतो. या किडीची अळी अवस्था पिकांना नुकसान पोहचविते. सुरुवातीच्या अवस्थेतील अळया पानाचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसतात. मोठया अळया पाने कुरतडून खातात. त्यामुळे पानांना छिद्रे दिसतात. अळी पोंग्यामध्ये शिरुन आत खाते. पानांना छिद्रे व पोंग्यामध्ये अळीची विष्ठा ही चिन्हे या अळीच्या प्रादुर्भावाची आहेत. या किडीच्या प्रादुर्भावामुळे ३० ते ६० टक्क्यापर्यंत उत्पादनात घट येते.





वातावरणातील घटकाचा लषकरी अळीवर परिणाम
§  ८.७सें. वाढीसाठी कमीत कमी तापमान लागते. यापेक्षा कमी तापमान झाल्यास किडीच्या वाढीवर विपरित परिणाम होतो.
§  ३९.२सें. वाढीसाठी जास्तीत जास्त तापमान लागते. यापेक्षा जास्त तापमान झाल्यास किडीच्या वाढीवर विपरित परिणाम होतो.
§  १८-३२सें. तापमान वाढत गेल्यास किडीचा वाढीचा कालावधी वाढतो.
§  २५सें. जवळपास तापमान वाढीसाठी सर्वोत्तम आहे.
§  २५-३०सें. तापमान असल्यास किडीचा खाण्याचा वेग वाढतो.
§  पावसाळ्यात सर्वात जास्त पतंग आढळतात.
§  ओलीताखालील पिकात कमी प्रादुर्भाव आढळतो.

सर्वेक्षण व निरीक्षण
§  किडीचा पिकावर प्रादुर्भाव आहे किंवा नाही यासाठी सर्वेक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. मका पिकाच्या लागवडीनंतर दोन आठवड्यानी सर्वेक्षणाला सुरुवात करावी. अमेरिकन लष्करी अळीच्या  सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्याचा वापर आणि प्रत्यक्ष शेताचे निरिक्षण  करावे.
कामगंध सापळ्याचा वापर
§  एक एकर क्षेत्र निवडावे. त्यात ५ कामगंध सापळे लावावेत. शेताच्या कडेच्या काही ओळी सोडून आत हे सापळे लावावेत. सापळ्यात आकर्षित झालेल्या पतंगाची दर आठवड्याला नोंद करावी. कामगंध  सापळ्यामुळे या किडीच्या प्रादुर्भाची सुरुवात कळते. त्यानुसार तिचे व्यवस्थापन करावे.



प्रत्यक्ष शेताचे निरिक्षण
§  एक एकर क्षेत्र निवडावे. शेतात नागमोडी किंवा  इंग्रजी ”x” अक्षरासारखे फिरुन ५ ठिकाणे निवडावी. प्रत्येक ठिकाणचे १० झाडे निवडावी. त्यापैकी प्रादुर्भावग्रस्त झाडांची संख्या मोजावी. टोकाकडील २-३ नवीन पाने, तुरा व कणसे यांचे निरिक्षण करावे.
§  पिकाची अवस्था व  प्रादुर्भावाची टक्केवारी पाहून व्यवस्थापन करावे.

पिकाची अवस्था व कालावधी
उपाययोजना करावयाची पातळी
रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था (उगवणीनंतर ते आठवडे)
५% प्रादुर्भावग्रस्त झाडे
मध्यम पोंग्याची अवस्था (५ ते ६ आठवडे)
१०% प्रादुर्भावग्रस्त झाडे
शेवटची पोग्याची अवस्था (७ आठवडे)
२०% प्रादुर्भावग्रस्त झाडे
तुयाची अवस्था व त्यानतर (८ आठवड्यानतर)
फवारणी टाळावी. पण १०% प्रादुर्भावग्रस्त कणसे असल्यास फवारणी करावी.


एकात्मिक व्यवस्थापन
मशागतीय पध्द्ती
  • हंगाम संपल्यावर पिकाचे अवशेष वेचून त्यांची विल्हेवाट लावावी.
  • जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील कोष प्रखर सुर्यप्रकाशाच्या उष्णतेनी मरुन जातील किंवा पक्षी वेचून खातील.
  • पेरणी वेळेवर करावी, टप्प्याटप्प्याने पेरणी टाळावी.
  • कणसावर घट्ट आवरण असलेल्या मक्याच्या वाणाची लागवड करावी.
  • मक्‍यामध्ये तू / मू / उडीद यांचे आंतरपीक घ्यावे. यामुळे कीटकांचे  संवर्धन होते.
  • मका पिकाभोवती नेपियर गवताच्या ते ओळी लावावे. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ५% निंबोळी अर्क किंवा अझाडीरक्टीन १५०० पीपीएम ५० मिली / १० लि. पाण्यात मिसळून फवारणी रावी.
  • वेळेवर कोळपणी व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
  • रासायनिक खताचा अतिरेकी वापर टाळावा.

भौतिक पद्धती
§  पीक ३० दिवसापर्यंतचे असल्यास बारीक वाळू किंवा बारीक वाळू व चून्याचे ९:१ प्रमाण करून  पोंग्या टाकावे.


यात्रिक पध्द्ती
  • अंडीपुंज, समुहातील लहान अळया आणि मोठ्या अळ्या हाताने वेचून राकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
  • सामुहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतग आकर्षित करून मारावेत. यासाठी १५ कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत.

जैविक पद्धती
§  किडींचे नैसर्गिक शत्रू जसे परभक्षी (ढालकिडा, मोठ्या डोळ्याचा ढेकूण इत्यादी) व परोपजीवी कीटक (ट्रायकोग्रामा, टिलोनेमस, कम्पोलेटीस इत्यादी) याचे संवर्धन करावे. यासाठी आंतरपिके शोभिवंत फुलांची झाडे लावावी.
§  
ट्रायकोग्रामा प्रीटीसम किंवा टीलेनोमस रेमस यांनी परोपजीवीग्रस्त ५०,००० अंडी प्रति एकर एक आठवड्याच्या अंतराने ३ वेळा किंवा कामगंध सापळ्यामध्ये पतंग / सापळा आढळून आल्यास शेतात सोडावे.


 ढालकिडा



                                  मोठ्या डोळ्याचा ढेकूण














रोपावस्था ते सुरुवातीची पोग्याची अवस्था या कालावधीत ५% प्रादुर्भावग्रस्त झाडे आणि शेवटी १०% प्रादुर्भावग्रस्त कणसे आढळून आल्यास उपयुक्त  बुरशी व जिवाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी.
अ.क्र.
सुक्ष्मजीवजन्य कीटकनाशक
मात्रा / १० लि. पाणी
मेटाहायजियम अॅनिसोप्ली (१ x १० सीएफ़यु/ग्रम)
५० ग्र
नोमुरिया रिलाई (१ x १० सीएफ़यु/ग्रम)
५० ग्र
बॅसिलस थुरिन्जिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती
२० ग्र

§  वरील जविक कीटकनाशके पीक १५ ते २५ दिवसाचे झाल्यास पोग्यामध्ये द्रावण जाईल अशाप्रकारे फ़वारणी करावी. त्यानंतर १० दिवसाच्या अंतराने ते फवारणी करावी.





                                  रोगग्रस्त अळ्या
 
 


रासायनिक पद्धती
बीजप्रक्रिया : स्यानट्रानिलीप्रोल १९.८% + थायामिथाक्झान १९.८% या मिश्र कीटकनाशकाची ४ मिली / किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
फ़वारणीसाठी कीटकनाशके
कालावधी
प्रादुर्भाची पातळी
कीटकनाशक
मात्रा / १० लि पाणी
रोपावस्था ते सुरुवातीची पोंग्याची अवस्था (अडी अवस्था) (उगवणीनंतर ते आठवडे)
५% प्रादुर्भावग्रस्त झाडे
निंबोळी अर्क किंवा
५%
अझाडीरक्टीन १५०० पीपीएम
५० मिली
मध्यम ते शेवटची पोंग्याची अवस्था (दुसया व तिसया अवस्थेतील अळ्या) (५ ते ७ आठवडे)
१०-२०% प्रादुर्भावग्रस्त झाडे
इमामेक्टीन बेझोएट ५ % डब्ल्युअजी किंवा
४ ग्र
स्पायनोटोरम ११.७ % एससी किंवा
 मिली
थायामिथॉक्झाम १२.६ % + लॅमडा साहॅलोथ्रिन ९.५ % झेडसी किंवा
५ मिली
क्लोरनट्रानिलीप्रोल १८.५ % एससी
४ मिली
शेवटच्या अवस्थेतील अळ्या
विषारी आमिषाचा वापर करावा. यासाठी १० किलो साळीचा भुसा व २ किलो गुळ २-३ लिटर पाण्यात मिसळून २४ तास सडण्यासाठी ठेवावे. वापर करण्याच्या अर्धा तास अगोदर यामध्ये १०० ग्रम थायोडीकार्ब ७५ डब्ल्युजी मिसळावे. हे विषारी आमिष पोग्यामध्ये टाकावे.

विशेष सूचना
  • रासायनिक किटकनाशकाची फ़वारणी चारा पिकावर करु नये.
  • एकाच रासायनिक किटकनाशकाची फ़वारणी हंगामात दोन पेक्षा जास्त वेळा करु नये.
  • तुयाची अवस्था व त्यानतर फ़वारणी टाळावी.
  • फ़वारणी करताना मजुराने सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी.
  • एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे.

    गेल्या वर्षीच्या हगामाच्या अनुभवानुसार जे शेतकरी मका पिकाची लागवड करत आहेत, त्यानी पिकाची उगवण झाल्याबरोबर निरिक्षण करुन या किडीच्या व्यवस्थापनासाठी तयार राहवे. या किडीसाठी वेळेवर उपाययोजना केल्यास निश्चितच व्यवस्थापन चागले होईल.


पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन