सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८


गुलाबी बोंडअळीच्या विविध अवस्था लक्षात घ्या व्यवस्थापन करा


      महाराष्ट्रामध्ये सुरवातीचा पाऊस चांगला झाल्यामुळे कपाशीची लागवड जूनमध्ये सर्व क्षेत्रावर झाली आहे. मागच्या वर्षी गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावमुळे शेतकऱ्यांचे कपाशीचे उत्पादन मोठया प्रमाणात घटले. त्याचबरोबर राजकीय, आर्थिक सामाजिक क्षेत्र ढवळून निघाले. त्यामुळे या हंगामामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाय योजना योग्य वेळी करणे गरजेचे आहे. मागील वर्षापासून कृषि विद्यापीठे, कृषि विभाग यांच्याकडून विशेष विस्तार कार्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गुलाबी बेांडअळीबद्दल जागृती निर्माण झाली आहे.
      गुलाबी बोंडअळी ही फुले किंवा बोंडाच्या आत राहते तिच्या प्रादुर्भावाची लक्षणे सहज लक्षात येत नसल्यामुळे तिचे व्यवस्थापन करणे अवघड आहे. यासाठी गुलाबी बोंडअळीच्या विविध अवस्था लक्ष्यात घेऊन त्या अवस्थेचे वेगवेगळ्या पध्दतीचा वापर केल्यास तिचे यशस्वीरित्या व्यवस्थापन करता येईल.

गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम
गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रमात पतंग, अंडी, अळी व कोष या चार अवस्था असतात.
पतंग : गुलाबी बोंडळीचे पतंग निशाचर असून दिवसा ते जमिनीवर किंवा भेगामध्ये लपून राहतात. कोषातून निघाल्यानंतर नर-मादी पतंगाचे मिलन ते दिवसामध्ये होते. कोषातून नर मादी पतंग निघण्याचे प्रमाण साधारणपणे : असते. मादी पतंग मिलनानंतरच्या दुसऱ्या रात्रीपासून अंडी टाकण्यास सुरवात करते ती पुढील १० दिवसापर्यंत अंडी टाकते. पतंग कपाशीच्या पानांच्या बुडाला असणाऱ्या रसावर जगतात. ते जवळपास १५ ते ३० दिवस जगतात.
अंडी : पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत मादी पतंग प्रामुख्याने, पाने, फुलावर एकएकटी किंवा ५-१० च्या समुहात घालते. बोंडे लागल्यानंतर बोंडाच्या बाहयदलाच्या आतील बाजूने बोंडावर अंडी घालते. अंडी अवस्था ३-४ दिवसाची असते.
अळी : पहिल्या पिढीची अंडयातून निघालेल्या अळया पाते फुलात शिरतात आत जाळी विणतात. बोंडे लागल्यावर अळी बोंडामध्ये आत शिरते, बोंडावरील छिद्र बंद होते. त्यामुळे बाहेरुन या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.
      गुलाबी बोंडअळीचे कमी कालावधीचा व दीर्घ कालावधीचा असे दोन जीवनक्रम असतात. प्रत्येक पिढीतील काही अळया कोषावस्थेत जातात त्यातून पंतग निघून पुढील पिढी तयार होते, यास कमी कालावधीचा जीवनक्रम म्हणतात. अळीची पूर्ण वाढ १२-१५ दिवसात होते.
      तसेच प्रत्येक पिढीतील काही अळया कोषावस्थेत जाता त्या सुप्तावस्थेत जातात. ही सुप्तावस्था पुढील हंगामापर्यंत राहते. काही वेळा २.५ वर्षापर्यंत अळया सुप्तावस्थेत राहु शकतात, यास दीर्घ कालावधीचा जीवनक्रम म्हणतात.
कोषकमी कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळया स्वत:भोवती पातळ जाते विणून पूर्ण वाढ झाल्यानंतर बोंडाला छिद्र पाडून मातीमध्ये कोषावस्थेत जातात. कोषावस्था ७-८ दिवसाची असते. तर दीर्घ कालावधीच्या अळया सरकीमध्ये स्वत: भोवती घट्ट जाळे विणून सुप्तावस्थेत जातात पुढील हंगामामध्ये अनुकुल वातावरण मिळाल्यावर कोषावस्थेत जाता त्यानंतर त्यातून पतंग बाहेर पडतात.


गुलाबी बोंडअळीची सुप्तावस्था
गुलाबी बोंडअळीची अळी अवस्था ही सुप्तावस्थेत जाते. यात अळी स्वत:भोवती दाट जाळे विणते त्यात निश्चल पडून राहते. प्रत्येक पिढीतील काही अळया सुप्तावस्थेत जातात. अळीचे सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण हे प्रामुख्याने प्रकाशमान दिवसाचा कालावधी, खादयाची उपलब्धता तापमान या बाबीवर अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा दिवसाचा कालावधी कमी होतो तापमान कमी होते, त्यानुसार अळयाचे सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण वाढते. महाराष्ट्रामध्ये ऑक्टोंबरडिसेंबर या कालावधीत अशी परिस्थिती असते. त्यानंतर जर खाद्य उपलब्ध असेल तर गुलाबी बोंडअळीच्या पुढील पिढया तयार होतात.
      महाराष्ट्रात खूप मोठया प्रमाणात फरदड घेतल्यामुळे या किडीस सतत खाद्य उपलब्ध झाल्यामुळे सद्यस्थिती उदभवली आहे.

गुलाबी बोंडअळीची सद्यपरिस्थिती
      महाराष्ट्रातील कपाशीची लागवड केलेल्या विविध जिल्हयामध्ये जुलैच्या शेवटच्या आठवडयामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव फुलामध्ये आढळून आला आहे. तसेच कामगंध सापळयामध्ये नर पतंग आकर्षित झालेल्या नोंदी आहेत.

गुलाबी बोंडअळीची संभाव्य परिस्थिती
. पहिली पिढी : पहिल्या पिढीमध्ये मादी पतंग पाते, खोड फुलावर एकएकटी किंवा ५-१० च्या समुहामध्ये अंडी घालते. अंडयातून अळी निघाल्यानंतर कळयामध्ये शिरुन आत जाळे विणते. त्यामुळे ही प्रादुर्भावग्रस्त फुले उमलत नाहीत. त्यांना डोमकळी असे म्हणतात. जर अळीने १० दिवसापेक्षा कमी कालावधीच्या फुलकळीवर प्रादुर्भाव केला तर त्या कळया खाली पडतात त्यातील अळी जीवंत राहू शकत नाही. पण जर १० दिवसापेक्षा अधिकच्या कालावधीच्या कळयावर प्रादुर्भाव झाला तर अळीची पूर्ण वाढ होऊन ती कोषावस्थेत जाते पुढील जीवनक्रम होतो. साधारणपणे ऑगस्टच्या शेवटपर्यंत पहिली पिढी पूर्ण होईल.
. दुसरी पिढी : गुलाबी बोंडअळीची दुसरी पिढी सप्टेंबरच्या सुरवातीपासून होण्याची संभावना आहे. या पिढीची मादी पतंग प्रामुख्याने बोंडावर अंडी घालतात. ही अंडी बोंडाभोवतीच्या बाह्यदलावर आतल्या बाजूने घातली जातात. अंडी घालण्यासाठी विशेष करुन १५-२० दिवसाची बोंडे निवडली जातात. अंडयातून अळी निघाल्यानंतर बोंडाना बारीक छिद्र करुन आत शिरते व आतील सरकी खाते. त्यानंतर कोषावस्थेत जाऊन पुढील पिढी निर्माण होते. सर्वसाधारणपणे दुसरी पिढी सप्टेंबर ते ऑक्टोबरचा पहिला पंधरवाडा या कालावधीत होण्याची शक्यता आहे.
      या पिढीच्या काही अळया सुप्तावस्थेत जातात, तर काही अळया कोषावस्थेत जाऊन तिसऱ्या पिढीची निर्मिती होते.
. तिसरी पिढी : गुलाबी बोंडअळीची तिसरी पिढी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाडा ते नोव्हेंबर महिन्यात होण्याची संभावना आहे. या पिढीची मादी पतंग बोंडावर अंडी घालते. अळीची पूर्ण वाढ बोंडात होते. यापैकी काही अळया सुप्तावस्थेत जातात उरलेल्या अळया कोषावस्थेत जाऊन पुढील पिढी तयार होते.
. चौथी पिढी : ही पिढी डिसेंबर ते जानेवारी मध्ये विविध ठिकाणी कपाशीच्या उपलब्धतेनुसार तयार होते.
      यानंतरदेखील कपाशीचे पीक शेतात राहिल्यास गुलाबी बोंडअळीला सतत खाद्य उपलब्ध झाल्यामुळे पुढ्च्या पिढ्या तयार होतात.



गुलाबी बोंडअळीच्या विविध अवस्थेचे व्यवस्थापन
      महाराष्ट्र शासनाव्दारे मागच्या हंगामामध्ये शेतकऱ्यामध्ये मोठया प्रमाणात जनजागृती केल्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची फरदड कमी करुन पऱ्हाटी लवकर काढली. तसेच या वर्षी कपाशीची पूर्ण हंगामी लागवड करता पाऊस पडल्यानंतर लागवड केली. यामुळे गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाला चांगली सुरवात झाली आहे. या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीचे नियमित निरीक्षण करुन तिच्या विविध अवस्थेचे व्यवस्थापन करावे.
अंडीचा बंदोबस्त
·         अंडी ही पाते, फुले बोंडावर असल्यामुळे काही अंडीचा नैसर्गिक शत्रु जसे परोपजिवी परभक्षक किटकामुळे बंदोबस्त होतो.
·         ५ टक्के निंबोळी अर्क किंवा निंबोळीयुक्त कीटकनाशकाची फ़वारणी करावी. यामुळे मादी पतंग तेथे अंडी टाकत नाही किंवा कमी प्रमाणात टाकतात.
·         उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामाटाॅयडी बॅक्ट्री या परोपजिवी गांधीलमाशीचा वापर करावा. (१.५ लाख अंडी / हेक्टर).
·         प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्युपी २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
अळयांचा बंदोबस्त
·         अंडयातून बाहेर निघाल्यानंतर अंडी तासाच्या आत फुले बोंडामध्ये शिरत असल्यामुळे कीटकनाशके किंवा नैसर्गिक शत्रुंना कमी बळी पडते.
·         कामगंध सापळयाच्या सर्वेक्षणानुसार अंडयातून अळी बाहेर पडण्याच्या वेळेची माहीती करुन कीटकनाशकाची फवारणी करावी.
·         फवारणीसाठी क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा लॅमडा साहॅलोथ्रीन ईसी १० मिली किंवा फेनवलरेट २० ईसी मिली किंवा प्रोफेनोफॉस ४० टक्के + सापरमेथ्रीन टक्के ईसी २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
·         वरीलपैकी लॅमडा साहॅलोथ्रीन, फ़ेनवलरेट, सायपरमेथ्रीन यापैकी कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी एक किंवा दोनच वेळा करावी.
कोषाचा सुप्तावस्थेतील अळयांच्या बंदोबस्त
·         कमी कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळया जमिनीत कोषामध्ये जातात.
·         कपाशीमध्ये आंतर मशागत केल्यास जमिनीतील कोष उघडे पडून उन्हामुळे किंवा नैसर्गिक शत्रुमुळे नष्ट होतील.
·         हंगाम संपल्यावर शेतामध्ये जनावरे चारावीत.
·         फरदड घेता पऱ्हाटीचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा.
·         जिनिंगमधील कपाशीची प्रक्रिया मे महिन्यापर्यंत संपवावी प्रादुर्भावग्रस्त सरकीमधील अळयांना मारण्यासाठी उपाययोजना करावी.
पतंगाचा बंदोबस्त
·         पतंगाचे व्यवस्थापन करणे अवघड आहे पण कामगंध सापळयाचा वापर करता येतो.
·         गुलाबी बोंडअळीचे कामगंध सापळे हेक्टरी १० सापळे शेतामध्ये लावावे. तसेच जिनिंग मिलमध्ये हे सापळे लावावेत. सापळयात आडकलेले पतंग जमा करुन नष्ट करावेत.
अशा प्रकारे गुलाबी बोंडअळीच्या अवस्था जिवनक्रमाचा विचार करुन उपाययोजना सामुहिकरीत्या केल्यास चालू हंगामाध्ये गुलाबी बोंडअळीमुळे होणारे नुकसानीचे प्रमाण कमी करता येईल शेतकऱ्यांना कपाशीचे अधिक चांगल्या प्रतिचे उत्पादन येईल.


पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन