बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मित्र किटकांचा सहभाग

 

 

एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मित्र किटकांचा सहभाग

 

 

१. एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे काय?

उत्तर : एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे एकमेकास पूरक अशा सर्व तंत्रज्ञानाचा वापर करुन किडीची संख्या कमी करणे जेणेकरुन ती आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली असेल. एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे मशागतीय, यांत्रिक, जैविक व रासायनिक या पध्दतीचा अवलंब करुन किडीचे व्यवस्थापन करणे, जेणेकरुन आर्थिक, आरोग्य व पर्यावरणीय धोके कमी होतील.

 

२. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मित्र किटकांची भुमिका काय आहे?

उत्तर : जैविक कीड व्यवस्थापनामध्ये मित्र किटकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. यामध्ये परभक्षी कीटक परोपजीवी कीटक यांचा समावेश होतो.

  • मित्र किटकामध्ये भक्ष्याना शोधून मारण्याची क्षमता असते.
  • मित्र कीटक हे स्वत:हून वाढणारे आहे. त्यांचे नैसर्गिकरित्या गुणन होऊन वाढ होते.
  • मित्र किटकांचा मनुष्यावर, प्राण्यावर किंवा इतरावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही.
  • मित्र किटकामुळे होणारे कीड नियंत्रण कायमस्वरुपीचे असल्यामुळे अर्ध शतकापूर्वी मित्र किटकाव्दारे मिळालेले यश आजपर्यंत कायम आहे.
  • मित्र किटकाप्रती प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची समस्या नसते.
  • मित्र किटकामुळे नुकसानकारक किडीमध्ये उद्रेक होण्याची समस्या नसते.
  • ­याचशा मित्र किटकांची सहज पैदास करता येते व वापरता येतात.
  • परभक्षी व परोपजीवी मित्र किटकाचा वापर इतर ब­याच कीड नियंत्रणाच्या पध्दती सोबत वापरता येतो फक्त किटकनाशके सोडून.

 

३. परभक्षी कीटक म्हणजे काय? हे कीटक एकात्मिक कीड व्यवस्थापमध्ये कशाप्रकारे मदत करतात ?

परभक्षी हे स्वतंत्रपणे राहणारे सजीव असून दुस­या सजीवावर उपजिवीका करतात.  हे बाल्य व प्रौढ या दोन्ही अवस्थावर उपजिवीका करतात व पूर्ण वाढ होण्यासाठी परभक्षी किटकाला एकापेक्षा जास्त भक्षांची गरज असते.

 

 

४. परोपजीवी कीटक म्हणजे काय? यांचा एकात्मिक कीड व्यवस्थापमध्ये उपयोग होतो?

उत्तर : परोपजीवी कीटक दुस­या किडीच्या अंडी, अळी व कोष यांच्या आत राहून आपली उपजिविका करतात.  प्रौढ परोपजीवी कीटक यजमानाच्या शरिरात किंवा शरिरावर अंडी घालतात.  त्या अंडयातून निघालेल्या अळया यजमानाचा विनाश करतात.  परोपजीवी कीटक हे बाल्यावस्थेत यजमान किडींवर जगतात आणि प्रौढ स्वतंत्र राहतात.

 

५. मित्र किटकाव्दारे यशस्वीरित्या व्यवस्थापनाची महत्वाची उदाहरणे सांगता येईल काय?

उत्तर : कपाशीवरील पिठ्या ढेकणाचे अनॅसिअस, प्रोम्युसिडी, अनॅगायरस; द्राक्षावरील पिठ्या ढेकणाचे क्रिपटोलेमस या ढालकिड्याद्वारे यशस्वीरित्या व्यवस्थापन झाले आहे.

 

६. कोणकोणते परभक्षी कीटक किडीच्या व्यवस्थापनासाठी महत्वाचे आहेत?

उत्तर : ढालकिडा (लेडीबर्ड बीटल) क्रायसोपा, सिरफिड माशी, भक्षक ढेकूण, प्रार्थना कीटक, चतुर, कॅराबीड भुंग्याची अळी इत्यादी

 

७. परभक्षी किटकांचा कोणकोणत्या किडीच्या व्यवस्थापनासाठी वापर करता येतो?

उत्तर : ढालकिडा (लेडीबर्ड बिटल) – रस शोषण करणाऱ्या किडी जसे मावा, पांढरी माशी, पिठया      ठेकूण

      क्रायसोपा - मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पतंगवर्गीय किडीची अंडी

      सिरफीड माशी - मावा

      भक्षक ढेकूण, प्रार्थना कीटक, चतुर – सर्व किडी

      कॅराबीड भुंग्याची अळी - पतंगवर्गीय किडीची अळी

 

८. ट्रायकोग्रामा हा परोपजीवी कीटक कीड व्यवस्थापनात कशाप्रकारे मदत करातो?

उत्तर : ट्रायकोग्रामाची माशी अतिसुक्ष्म असते. ती दुसऱ्या किडीच्या अंडयात आपली अंडी घालते, त्यामुळे अंडी अवस्थेतच त्या किडींचा नायनाट होतो. अशी ट्रायकोग्रामाची अंडी असलेली ट्रायकोकार्ड आपणाला विकत मिळू शकतात. एका कार्डावर 40 हजार अंडी असतात आणि हे 1 कार्ड 1 एकरासाठी पुरेसे होते. ट्रायकोग्रामाचा वापर कपाशीवरील बोंडअळ्या, उस, ज्वारी, भातावरील खोडकिडी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी इत्यादी किडींच्या व्यवस्थापनासाठी वापरू शकतो.

 

 

९. किडीच्या अळी अवस्थेचे कोणकोणत्या परोपजीवी किटकामुळे व्यवस्थापन होते?

उत्तर : अॅपेनटेलस, कॅम्पोलेटीस, रोगस, ब्रेकोन इत्यादी परोपजीवी किटकामुळे किडीच्या अळी अवस्थेचे व्यवस्थापन होते.

१०. मित्र किटकांचे संवर्धन करण्यासाठी कोणत्या बाबी करणे गरजेचे आहे?

  • किटकनाशकांचा अतिरेकी वापर टाळावा.
  • किटकनाशक निवडतांना कमी कालावधीपर्यंत अंश राहणारे वापरावे.
  • खंड पध्दतीने किटकनाशके फवारावीत. कमी हानीकारक व निवडक किटकनाशके फवारावीत.
  • शिफारस केलेली किटकनाशकाची मात्रा वापरावी.
  • जैविक किटकनाशकांचा वापर करावा.
  • मित्र किटकांना अन्न व निवारा पुरवठा करावा. शेताच्या बांधावर भरपूर परागकण असणारी फुलझाडे लावावीत, जेणेकरुन प्रौढ मित्र किटकांना खाद्य मिळेल.
  • मित्र किटकांना हानिकारक नसलेल्या व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करावा. शेतातील पालापाचोळा जाळणे थांबवावे.
  • मुंग्याचे नियंत्रण करावे कारण मुंुग्या मित्र किटकांच्या कार्यात अडथळा निर्माण करतात.
  • सापळा पिकांचा वापर करावा.

 

११. शेतकऱ्याना शेवटी काय संदेश दयांल?

उत्तर : मित्र किटक हे नुकसान करणा­या किडींवर उपजिविका करुन त्यांना नष्ट करतात. अशा मित्र किटकांची ओळख करुन संवर्धन केल्यास शाश्वत पध्दतीने किडीचे नियंत्रण होते व रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी होऊ निसर्गावर विपरीत परिणाम देखील होत नाही.

 

 

 

पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन