रविवार, २४ मे, २०२०


भारत सरकारने बंदी घातलेली कृषि रसायने (२०१८-२०२०)
अ. क्र.
कृषि रसायने
अ. क्र.
कृषि रसायने
भारत सरकारचे राजपत्र दि. ९/८/२०१८
भारत सरकारचे राजपत्र दि. १८/५/२०२०
कीटकनाशके
कीटकनाशके / कोळीनाशक
कार्बारिल
अॅसिफ़ेट
डायझिनाॅन
बेनफ़्युराकार्ब
फ़ेनथिआॅन
कार्बोफ़्युराॅन
मिथिल पॅराथिआॅन
क्लोरपायरिफ़ाॅस
थायोमेटाॅन
डेल्टामेथ्रीन
डायक्लोरव्हास
डायकोफ़ाॅल
फ़ोरेट
मॅलाथिआॅन
फ़ाॅसफ़ोमिडाॅन
मिथोमिल
ट्रायझोफ़ाॅस
मोनोक्रोटोफ़ाॅस
१०
ट्रायक्लोरोफ़ोन
१०
क्विनलफ़ाॅस
बुरशीनाशके
११
थायोडीकार्ब
बेनोमिल
बुरशीनाशके
फ़ेनारिमोल
कॅप्टान
ट्रायडोमाॅर्फ़
कार्बेन्डाझीम
तणनाशके
डायनोकॅप
अलॅक्लोर
मॅनकोझेब
लिनयुराॅन
थायोफ़ॅनेट मिथिल
ट्रायफ़्ल्युरॅलीन
थायरम
इतर
झायनेब
सोडियम सायनाईड
झायरम
मिथिल इथिल मर्क्युरी क्लोराईड
तणनाशके
भारत सरकारचे राजपत्र दि. ३/२/२०२०
अट्रॅझीन
कीटकनाशक
ब्युटॅक्लोर
बुप्रोफ़ेझीन
डाययुराॅन
बुरशीनाशक
२, ४ डी
ट्रायसायक्लॅझोल
आॅक्झीफ़्ल्युओरफ़ेन


पेन्डीमिथॅलीन


सल्फ़ोसल्फ़्युराॅन



बीटी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन

      गुलाबी बोंडअळीमुळे मागील ६-७ वर्षापासून कपाशीच्या उत्पादनात घट येत असून उत्पादन खर्चदेखील वाढला आहे. ही कीड बोंडाच्या आत असल्यामुळे सहजासहजी नियंत्रणात येत नाही. तसेच अळी अवस्था सुप्तावस्थेत राहून पुढील हंगामातील प्रादुर्भावाचे स्त्रोत बनते. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम व तिच्या सुप्तावस्थेची माहिती असणे आवश्यक आहे. ही बोंडअळी बोंडाच्या आत राहून उपजिविका करते, बाहेरुन या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यासाठी वेळेवर शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

§  २००२ : बीटी (बीजी १) कपाशीच्या लागवडीस मान्यता
§  २००६ : बीजी २ बाजारात उपलब्ध
§  २००८ : गुजरातमध्ये क्राय१एसी यास गुलाबी बोंडअळीमध्ये प्रतिकारशक्ती
§  २००९-१० : महाराष्ट्रात बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव
§  २०१४ : गुजरातमध्ये बीजी २ कपाशीवरसुद्धा गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव
§  २०१७ : महाराष्ट्रात बीजी २ कपाशीवरसुद्धा गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव
§  २०१ व २०१९ : महाराष्ट्रामध्ये शेतक–यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे यशस्वी व्यवस्थापन

२०१८ व २०१९ च्या हंगामामध्ये गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाच्या यशाची कारणे
§  कृषी विद्यापीठे, कृषी विभाग, खाजगी कंपन्या, व इतर संस्था त्यांच्यामध्ये उत्तम समन्वय झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक जनजागृती निर्माण करण्यात यश आले.
§  कपाशीच्या पराट्याची लवकर विल्हेवाट लावली.
§  जिनिंग मिलमध्ये पतंगाचे कामगंध सापळयाद्वारे सामूहिकरीत्या आकर्षित करून विल्हेवाट लावली. जिनिंग मिलमध्ये किडग्रस्त सरकी व सुप्तअवस्थेतील अळ्यांची विल्हेवाट लावली.
§  कपाशीच्या बियाण्याची उपलब्धता जूनमध्ये करण्यात आली. त्यामुळे पूर्वहंगामी कपाशीच्या लागवडी झाली नाही.
§  कमी कालावधीच्या कपाशीच्या वाणावर भर देण्यात आला, तसेच बिगर बीटी बियाणे बीटी बियाण्यात मिसळूनच बियाण्याची विक्री केली.
§  कामगंध सापळे याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटले. कामगंध सापळ्याद्वारे मोठ्या प्रमाणात पतंग आकर्षित करुन त्यांची विल्हेवाट लावली.
§  हंगामात वेळेवर सुरुवातीलाच गुलाबी बोंडळीचे निदान झाले. निदान झाल्याबरोबर शेतकऱ्यांनी उपाययोजना केली.

ओळख
शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रमात अंडी, अळी, कोष पतंग या चार अवस्था असतात.
अंडी : अंडी आकाराने चपटी, लंबगोल, मि.मी. लांब असतात. रंगाने मोत्यासारखी चमकदार पांढरी असून पृष्ठभाग खडबडीत असतो. अंडी सुरुवातीला हिरवट रंगाची असून पक्व झाल्यावर लालसर किंवा नारंगी दिसतात.
अळी : अंड्यातून निघालेली अळी लहान, मि.मी. लांब, पांढरी असून तिचे डोके तपकिरी असते. पूर्ण वाढलेली अळी ११-१३ मि.मी. लांब, लंबगोलाकार, पांढरी असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो. हा गुलाबी पट्टा नंतर पूर्ण शरिरावर पसरतो. त्यामुळे पूर्ण शरिर गुलाबी दिसते. नर अळीच्या शरिरातील गडद तपकिरी जननग्रंथी वरच्या बाजूने दिसतात.
कोष : कोष लालसर तपकिरी, ८-१० मि.मी. लांब असून मागची बाजू टोकदार असते.
पतंग : पतंग ८-९ मि.मी .लांब, करड्या तपकिरी रंगाचे असून समोरच्या पंखावर काळ पट्टे असतात. मागील पंख रुपेरी करडी असून कडांना झालर असते.


यजमान वनस्पती
कापूस, अंबाडी, मुद्रिका, भेंडी

नुकसानीचा प्रकार
अंड्यातून निघालेली अळी ताबडतोब पाते, कळ्या, फुले बोंडाना छोटे छिद्र करुन आत शिरते. सुरुवातीला अळ्या पाते, कळ्या, फुलांवर उपजिवीका करतात. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. अशा कळ्यांना  डोमकळ्या म्हणतात. प्रादुर्भावग्रस्त पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व होताच फुटतात गळून गेलेली बोंडे सडतात. बोंडामध्ये एकदा का ही अळी शिरली की तिची विष्ठा बोंडाचे बारीक कण यांच्या साहाय्याने ही छिद्रे बंद करते. त्यामुळे बोंडावर या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. अळी बोंडातील बिया खाते. एक अळी १-५ बिया खाते. त्याचबरोबर अळी रुई कातरुन नुकसान करते. त्यामुळे रुई सडते खराब होते. प्रादुर्भावग्रस्त बोंडाची वाढ खुंटते, बोंडे पूर्णपणे फुटत नाहीत. अळी बोंडातील बिया खाते एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात शिरते. त्यामुळे रुईची प्रत खालावते. त्याचबरोबर सरकीतील तेलाचे प्रमाण कमी होते. अळी कपाशीच्या ते बिया एकत्र जोडून त्यात कोषावस्थेत जाते. अशा बियांना जोडबीज म्हणतात. सरकी किडल्यामूळे बियाण्याच्या उगवणीचे प्रमाण खूप कमी होते. या किडीच्या अळ्या जिनींग मिल, कोठारात सरकीत आढळतात.


 सक्रियता
शेंदरी बोंडअळीचा सर्वात जास्त प्रादुर्भाव उत्तर भारतात ऑगस्ट-नोव्हेंबर आणि मध्य भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर तसेच दक्षिण भारतात डिसेंबर-एप्रिल या कालावधीत आढळतो.

बीटी कपाशीवरील शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भावाची कारणे
1.  कपाशीच्या फरदडीखाली क्षेत्रात वाढ : कपाशीच्या फरदडीखालील क्षेत्रात वाढ झाल्यामुळे शेंतामध्ये वर्षभर कपाशीचे पीक राहते. शेंदरी बोंडअळी ही डिसंबरनंतर खाद्य उपलब्ध नसल्यास सुप्तावस्थेत जाते. पण फरदडीमुळे तिचा जीवनक्रम चालू राहतो. तसेच पुढील हंगामात एप्रिलमे मध्ये लागवड करण्यात येते. यामुळे किडीच्या जीवनक्रमात खंड पडत नाही.
2.  जास्त कालावधीचे कपाशीचे संकरित वाण : जास्त कालावधीच्या संकरीत वाणामुळे शेंदरी बोंडअळीला सतत खाद्य उपलब्ध होत राहतो.
3.  विविध प्रकारच्या कपशीच्या संकरित वाणाची मोठी संख्या : भारताध्ये २०१४ पर्यंत ११६७ बीटी संकरित वाणांना मान्यता देण्यात आली. या वाणांचा फुले व बोंड लागण्याचा कालावधी वेगवेगळा असल्यामुळे शेंदरी बोंडअळीस सतत खाद्य उपलब्ध होत राहते.
4.  कच्च्या कापसाची जास्त कालवधीपर्यत साठवणूक : जिनींग मिल व बाजरात कच्चा कापूस शेंदरी बोंडअळीच्या अळी व कोषासह जास्त काळ साठवण करण्यात येते. या अळया/कोष पुढील हंगामाच्या कपाशीवर प्रादुर्भावाचा स्त्रोत होतात.
5.  पिकाच्या अवशेषाची शेतात साठवणूक : हंगाम संपल्यानंतर कपाशीच्या प­हाटया व अवशेष शेतात किंवा शेताजवळ तसेच रचुन ठेवणे व वेळेवर विल्हेवाट न लावणे.
6.  कपाशीची लवकर लागवड : ठिबक सिंचनावर कपाशीची लागवड मे महिन्यात मोठया प्रमाणात होत आहे. मागील हंगामातील प­हाटया शेतात तशाच ठेवणे आणि लवकर लागवड यामुळे शेंदरी बोंडअळीच्या जीनक्रमात खंड पडत नाही. म्हणून जून-जुलैमध्ये या बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
7.  बीटी जनुकास प्रतिकारशक्ती : शेंदरी बोंडअळीमध्ये क्राय १ एसी व क्राय २ एबी या दोन्ही बीटी जनुकास प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे बीटी कपाशीवर या बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे.
8.  बीटी विषाचे प्रकटीकरण : शेंदरी बोंडअळी पाते, फुले व बोंडावर उपजिविका करते. बीटी विषाचे प्रकटीकरण कपाशीच्या पाते, फुले व बोंडामध्ये कमी प्रमाणात असते. त्याचबरोबर कोरडवाहु बीटी कपाशीमध्येसुध्दा बीटी विषाचे प्रकटीकरण कमी असते.
9.  संकरित वाणाच्या पहिल्या पिढीतील कपाशीच्या विषामधील जनुकाचे विलगीकरण : केवळ भारतामध्येच बीटी कपाशीच्या संकरित वाणाची लागवड केली जाते. या संकरित वाणाच्या पहिल्या पिढीतील झाडावरील बोंडामध्ये असलेल्या बियामध्ये जनुकाचे विलगीकरण होते. उदा. बोलगार्ड २ कापसामध्ये क्राय १ एसी व क्राय २ एबी हे दोन जनुक आहेत. पहिल्या पिढीतील बोंडामध्ये असलेल्या बियामध्ये जनुकाचे ९:३:३:१ या प्रमाणात विलगीकरण होते. म्हणजेच ९ बियामध्ये क्राय १ एसी  व क्राय २ एबी हे दोन्ही जनुक, ३ बियामध्ये केवळ क्राय १ एसी, ३ बियामध्ये केवळ क्राय २ एबी आणि एका बियामध्ये कोणतही जनुक नाही. ही परिस्थिती प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास अतिशय पोषक आहे.
10. आश्रय पिकाच्या ओळी न लावणे.
11. योग्य वेळी शेंदरी बोंडअळीचे व्यवस्थापन न करणे : शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव बाहेरुन ओळखू येत नाही. तसचे बीटी मुळे या बोंडअळीचे व्यवस्थापन होईल, अशी खात्री होती, यामुळे या किडीच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले.
12. काही किटनाशके/किटकनाशकची मिश्रणे यांची फवारणी : कपाशीवर मोनोक्रोटोफॉस व अॅसिफेट ही किटकनाशके किंवा त्यांची मिश्रणे यांची फवारणी केल्यास कपाशीची कायिक वाढ होते. त्यामुळे फुले व बोंडे लागण्यामध्ये अनियमितता येते. त्यामुळे या किडीला सतत खाद्य उपलब्ध राहते.

जीवनक्रम
कोषातून पतंगाची उत्पत्ती झाल्यानंतर २-३ दिवसांनी नर व मादीचे मिलन होते. मादी पतंग पहिल्या पिढीची अंडी ही कपाशी कायिक वाढीच्या अवस्थेत असतांना पात्याजवळ किंवा पात्यावर घालते. दुसऱ्या व त्यानंतरच्या पिढीची अंडी बोंडावर घालते. अंडी एकएकटी किंवा ४-५ च्या समुहात असतात. एक मादी १०० पेक्षा जास्त अंडी घालते. अंडी अवस्था ३-७ दिवसांची असते. अंड्यातून निघालेली अळी ताबडतोब पाते, फुले किंवा बोंडामध्ये शिरते. अळी तीन वेळा कात टाकते. अळीचे दोन प्रकारचे जीवनक्रम असतात.
  • कमी कालावधीचा जीवनक्रम (पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जाते व त्यातून ताबडतोब पतंग बाहेर पडून पुढील जीवनक्रम होतो): कमी कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळ्या बोंडाला छिद्र करुन बाहेर निघून जमिनीवर पालापाचोळ्यात कोषावस्थेत जातात किंवा पूर्ण वाढलेली अळी बोंडाला छिद्र करते व बोंडामध्ये कोषावस्थेत जाते. अळी अवस्था ८-२१ दिवस असते. कोषावस्था ६-२० दिवस असते. कोषावस्थेतून पतंग बाहेर पडतात. साधारणपणे नर-मादीचे प्रमाण १:१ असते. पतंग ५-३१ दिवस जगतात.
  • दीर्घ कालावधीचा जीवनक्रम (पूर्ण वाढलेली अळी सुप्त अवस्थेत राहते): दीर्घ कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळ्या स्वत:भोवती गोलाकार कोष विणून त्यात सुप्तावस्थेत राहतात. ही सुप्तावस्था पुढील हंगामापर्यंत किंवा दोन वर्षे देखील राहते. हा दीर्घ कालावधीचा जीवनक्रम हंगामाच्या शेवटी आढळून येतो.
कमी कालावधीचा जीवनक्रम ३-४ आठवड्यात आणि दीर्घ कालावधीचा एक जीवनक्रम ५-१० महिन्यात पूर्ण होतो. वर्षभरात ४-६ पिढ्यांची उत्पत्ती होते.

गुलाबी बोंडअळी सुप्तावस्था
  • कपाशीवरील गुलाबी बोंडअळी ही अळी अवस्थेत सुप्तावस्थेत जाते.
  • अळी स्वत:भोवती रेशमी धाग्याचे आवरण करुन त्यात सुप्तावस्थेत जाते.
  • जमिनीवर पडलेल्या पालापाचोळा किंवा, झाडावर न वेचलेल्या बोंडामध्ये आणि सुत गिरण्यामध्ये साठविलेल्या कपाशीमध्ये भेगामध्ये सुप्तावस्थेतील अळया आढळून येतात.
  • अळी बोंडातील बियाच्या आतील भाग खाऊन शिल्लक राहिलेल्या टरफलामध्ये सुप्तावस्थेत जाते.
  • गुलाबी बोंडअळीच्या सुप्तावस्थेवर दिवस रात्रीचा कालावधी, तापमान आणि खाद्य हे घटक परिणाम करतात.
  • सर्वसाधारणपणे जेव्हा दिवसाचा कालावधी कमी होतो व तापमान कमी होते, त्यानुसार अळयाचे सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण वाढते. महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरडिसेंबर यानंतरच्या कालावधीत अशी परिस्थिती असते.
  • नोव्हेंबरडिसेंबर मध्ये कमी कालावधीचा दिवस यासोबत कमी तापमान कोवळया बोंडाची संख्या कमी झाल्यावर गुलाबी बोंडअळी सुप्तावस्थेत जाण्याला सुरुवात होते.
  • या जीवनक्रमात काही अळया सुप्तावस्थेत जातात, तर शिल्लक राहिलेल्या अळया कोषात जातात आणि त्यातून पतंग बाहेर पडून पुढील पिढी तयार होते.
  • यानंतरच्या जीवनक्रमातील अळयांचे सुप्तावस्थेत जाण्याचे प्रमाण हळूहळू वाढते.
  • हंगामाच्या शेवटी शेतात शिल्लक राहिलेल्या बोंडामध्ये आणि जिनिंग मिलमध्ये साठविलेल्या कापसामध्ये सर्व अळया सुप्तावस्थेत जातात.
  • सुप्तावस्थेत गेलेली बोंडअळी प्रामुख्याने पुढील हंगामामध्ये पावसाळयामध्ये कोषात जाऊन त्यातून पतंग बाहेर पडतात आणि नवीन लावगड केलेल्या कपाशीवर अंडी घालतात.
  • ज्या ठिकाणी शेतामध्ये पऱ्हाटी लवकर काढली नाही आणि जिनिंग मिलजवळील शेतामध्ये नविन लागवड केलेल्या कपाशीवर पहिल्यांदा प्रादुर्भाव आढळून येतो.
  • सुप्तावस्थेतून बाहेर येण्यासाठी जास्त आर्द्रता असावी लागते.
  • गुलाबी बोंडअळीची सुप्तावस्था ६-८ महिन्याची सर्वसाधारणपणे असते. परंतु हा कालावधी अडीच वर्षापर्यंत आढळून आल्याची नोंद आहे.

एकात्मिक व्यवस्थापन
हंगाम संपल्यानंतर
  • हंगामाच्या शेवटी झाडावर शिल्लक राहिलेल्या व खाली पडलेल्या बोंडामध्ये सुप्तावस्थेतील अळया असतात. हंगाम संपल्यावर शेतातील पऱ्हाटी काढून पुढील हंगामाअगोदर विल्हेवाट  लावावी. तसेच जमिनीवर पडलेले किडकी बोंडे पिकाचे अवशेष वेचून नष्ट करावी. यामध्ये सुप्तावस्थेतील अळ्यापासून पुढील हंगामामध्ये होणारे प्रादुर्भाव -याच प्रमाणात कमी करता येईल.
  • फरदरड घेऊ नये : फरदड घेतल्यास शेंडयाकडे बोंडे लागतात. ही बोंडे लहान असून यामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. त्यामुळे फरदड घेतलेल्या कपाशीपासून कमी निकृष्ट दर्जाचे उत्पादन येते. तसेच बोंडअळीचा जीवनक्रम चालू राहतो आणि पुढील हंगामामध्ये जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.
  • उन्हाळयात जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील भेंगामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या अळया प्रखर सुर्यप्रकाशाने मरतील किंवा पक्षी वेचून त्यांना खातील.
  • कपाशीवर जिनिंग मिलमध्ये पुढील हंगाम सुरु होण्याअगोदर प्रक्रिया करावी. जर प्रक्रिया करण्यास उशीर होणार असेल तर धुरीजन्य कीटकनाशकाची प्रक्रिया करावी. किडलेल्या सरकीची विल्हेवाट लावावी.

लागवड करतेवेळी
  • पीक फेरपालट करावी. अंबाडी, भेंडी, मुद्रिका अशी पिके कपाशीपुर्वी किंवा नंतर घेऊ नयेत, त्यामुळे या बोंडअळीच्या जीवनक्रमात खंड पडेल.
  • आश्रय ओळी लावावे. देशी कापूस, पारंपारिक बिगर बीटी कापूस किंवा उशिरा लावलेली भेंडी हे आश्रय पीक म्हणून लावावे.
  • कमी कालावधीचे (१५० दिवस) आणि एकाच वेळी जवळपास वेचणी करता येणा­या संकरित वाणाची लागवड करावी.
  • रस शोषण करणा­या किडीसाठी प्रतिबंधात्मक वाणाची निवड करावी. यामुळे या किडींच्या व्यवस्थापनासाठी फवारण्यात येणा­या काही किटकनाशकामुळे फुले लागण्यात येणारी अनियमितता टाळता येते.

लागवड केल्यानंतर
·         कमी कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळया जमिनीत कोषामध्ये जातात. कपाशीमध्ये आंतर मशागत केल्यास जमिनीतील कोष उघडे पडून उन्हामुळे किंवा नैसर्गिक शत्रुमुळे नष्ट होतील.
  • प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाते व बोंडे जमा करुन नष्ट करावेत.
  • डोमकळया दिसून आल्यास त्या तोडून आतील अळयासह नष्ट करावे.
  • कामगंध सापळयाचा वापर शेंदरी बोंडअळीचे पतंग मोठया प्रमाणात आकर्षित करुन नष्ट करणे. कामगंध सापळे हेक्टरी २० सापळे शेतामध्ये लावावे.
  • नियमित सर्व बीटी कपाशीचे सर्वेक्षण करावे. कामगंध सापळयाचा वापर करुन किंवा हिरवी बोंडे फोडून या बोंडअळीचे सर्वेक्षण करावे.
  •  ५ टक्के निंबोळी अर्क किंवा निंबोळीयुक्त कीटकनाशकाची फ़वारणी करावी. यामुळे मादी पतंग तेथे अंडी टाकत नाही किंवा कमी प्रमाणात टाकतात.
  • उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामाटाॅयडी बॅक्ट्री या परोपजिवी गांधीलमाशीचा वापर करावा. (१.५ लाख अंडी / हेक्टर).
  • कामगंध सापळे आणि प्रकाश सापळयांचा वापर करावा. हंगामामध्ये हे सापळे शेतामध्ये आणि हंगाम संपल्यावर जिनींग मिलजवळ, बाजारातमध्ये लावावेत.
  • आर्थिक नुसानीची पातळी : ८-१० पतंग प्रति सापळा सलग ३ रात्री किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त हिरवी बोंडे. ही पातळी ओलांडल्यानंतर खालील रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.
कीटकनाशके
प्रमाण / १० लि. पाणी
प्रोफेनोफॉस ५० ईसी किंवा
३० मिली
लॅमडा साहॅलोथ्रीन ५ ईसी किंवा
६ मिली
सायपरमेथ्रीन २५ ईसी किंवा
४ मिली
फेनवलरेट २० ईसी  किंवा
८ मिली
प्रोफेनोफॉस ४० टक्के + सापरमेथ्रीन ४ टक्के ईसी किंवा
१० मिली
थायामिथाक्झाम १२.६ + लॅमडा साहॅलोथ्रीन ९.५  झेडसी किंवा
४ मिली
क्लोरॅनट्रानीलिप्रोल ९.३ + लॅमडा साहॅलोथ्रीन ४.६ झेडसी किंवा
४ मिली
पायरिप्राॅक्झीफ़ेन ५ + फ़ेनप्रोपॅथ्रीन १५ ईसी
१० मिली

  • रील प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे.
  • लागोपाठ एकाच किटकनाशकाची फ़वारणी करु नये.
  • पायरेथ्रॉईड गटातील किटकनाशकाची (लॅमडा साहॅलोथ्रीन, फेनवलरेट, सायपरमेथ्रीन) फवारणी नोव्हेंबर महिन्याअगोदर करु नये. यामुळे पांढ­या माशीचा उद्रेक होतो.

अशा प्रकारे गुलाबी बोंडअळीच्या अवस्था जिवनक्रमाचा विचार करुन उपाययोजना सामुहिकरीत्या केल्यास चालू हंगामाध्ये गुलाबी बोंडअळीमुळे होणारे नुकसानीचे प्रमाण कमी करता येईल शेतकऱ्यांना कपाशीचे अधिक चांगल्या प्रतिचे उत्पादन येईल.



पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन