शनिवार, १४ मे, २०१६

हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन

हुमणी ही बहुभक्षी कीड, असून उन्नी, उकरी, गांढर, खतातील अळी, मे-जू भुंगेरे किंवा जून भुंगेरे, कॉकचाफर्स मुळे खाणारी अळी या नावानेसुध्दा ओळखली जातात. हुमणी ही शेतकरी शास्त्रज्ञांनासुध्दा अतिश कठीण ज्वलंत समस्या म्हणून सामोरी आली आहे. मागील काही वर्षापासून मराठवाडयामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळया पिकांना नुकसान करत आहे. दरवर्षी या किडीमुळे प्रादुर्भावग्रस्त क्षेत्र वाढतच आहे. किडींचा प्रादुर्भाव जवळपास सर्व पिकांच्या जातीवर दिसून येत आहे. हलकी जमिन मध्यम ते कमी पाऊस हे हुमणीसाठी अनुकुल आहे. मागील काही वर्षापासून मराठवाडयामध्ये अनियमित पाऊस होत असल्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ही कीड व्यवस्थापन करण्यासाठी अतिशय अवघड असून यासाठी तात्काळ सामुदायिकरित्या व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यामध्ये या किडीबददल जागृती करणे गरजेचे आहे. तरच सर्व शेतकऱ्यांच्या सामुदायिक प्रयत्नाव्दारे हुमणीचे यशस्वीरित्या नियंत्रण करता येईल.

ओळख
हुमणीच्या प्रौढ, अंडी, अळी कोष या चार अवस्था असतात.
  • प्रौढ : प्रौढ भुंगेरे रंगाने लालसर किंवा तपकिरी, लांबी 2 सें.मी. रुंदी 1 सें.मी. एवढी असते. यांचे समोरील पंख टणक मागील पंखाची जोडी पातळ पारदर्शक असते. मादी ही नरापेक्षा थोडी मोठी असते. भुंगेरे निशाचर असून उडताना घुं s s घुं s s असा आवाज करतात.
  • अंडी : अंडी पिवळसर पांढरी आकाराने अंडाकृती असतात.
  • अळी : अळीचे शरीर मऊ, पांढरे असून तिचे डोके मजबूत, पिवळसर लाल किंवा तपकिरी असते. पूर्ण वाढलेली अळी 3-5 सें.मी. असते. अळी जेव्हा विश्रांती करते त्यावेळी ती इंग्रजी अक्षर ‘C’  सारखी दिसते. अळीच्या मागील टोकाकडील शरीरातील माती दिसते. अळीला पायाच्या ती जोडया असतात.
  • कोष : कोषाची लांबी 3 सें.मी. रुंदी 1.2 सं.मी., रंग तपकिरी असतो.

जीवनक्रम
      पहिल्या चांगल्या पावसानंतर मे किंवा जूनमध्ये सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे जमितीतून बाहेर निघतात. संध्याकाळी हे प्रौढ भुंगेरे खाद्य वनस्पतीभोवती थोडा वेळ उडतात नंतर झाडावर बसून रात्रभर पाने खातात. नर  मादीचे मिलन रात्रीलाच या झाडावर होतो. पहाट झाल्यावर हे भुंगेरे जमिनीत लपतात. मिलन झाल्यानंतर मादी सकाळी ओलसर मातीमध्ये 7-12 सें.मी. खोलीपर्यंत अंडी घालते. मादी साधारणपणे 20-25 अंडी घालते. अंडी जू, जुलै ऑगस्टपर्यंत घातली जातात. अंडी अवस्था 8 ते 10 दिवसाची असते, त्यानंतर अंडी ऊबवू अळया बाहेर पडतात. अळीच्या तीन अवस्था असतात. पहिल्या अवस्थेतील अळी जमिनीतील कुजलेले पदार्थ खाते. दुसऱ्या तिसऱ्या अवस्थेतील अळी पिकांच्या मुळा कुरतडून त्यावर उपजिविका करते. अळीची पूर्ण वाढ 6-8 महिन्यामध्ये होते. पुर्ण वाढ झालेली अळी जमिनीत 20-40 सें.मी. खोलीवर मातीचे कोषावरण तयार करुन त्यामध्ये कोषावस्थेत जाते. कोषावस्था 2-3 आठवडयाची असते. यानंतर कोषातून प्रौढ बाहेर पडतात जमिनीतच सुप्तावस्थेत राहतात. हिल्या पावसापर्यंत हे प्रौढ भुंगेरे अशीच जमिनीत राहतात. प्रौढ 1 ते 3 महिने जीवंत राहतात. हुमणी किडीची एका वर्षामध्ये केवळ एकच पिढी तयार होते.
     


  
खाद्य वनस्पती
प्रौढ भुंगेरे अळी यांच्या खाद्य वनस्पती वेगवेगळी आहेत.
  • प्रौढ भुंगेरे : प्रौढ भुंगेरे बाभुळ, कडुनिंबाची पाने खातात.
  • अळी : अळी विविध पिकांच्या मुळा कुरतडून त्यावर उपविविका करते जसे सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, गहू, मका, ऊस, भुईमू, सूर्यफुल, मुग, मिरची, बटाटा, चवळी, टोमॅटो, कांदा, हळद, अद्रक, भाजीपाला पिके इत्यादी.

नुकसानीचा प्रकार
      हुमणीची अळी अवस्था ही जमिनीत राहून पिकांना नुकसान पोहचविते. अळी पिकाची मुळे कुरतडून खाते. त्यामुळे झाडे सुरवातीला पिवळे पडून सुकतात आणि नंतर वाळून जातात. अळयांनी झाडांची मुळे कुरतडल्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडे सहजरित्या उपटली जातात. तसेच जोराचे वादळ आल्यास ही झाडे कोलमडून पडतात. या अळीचा प्रादुर्भाव एका रेषेत दिसून येतो. प्रादुर्भाव जास्त झाल्यास संपूर्ण शेतात वेगवेगळया जागी मोठया प्रमाणात झाडे वाळून जातात.








एकात्मिक व्यवस्थापन
हुमणीचे प्रौढ भुंगेरे अळया यांचे खाद्य आढळ वेगवेगळी आहेत. त्यामुळे या दोन्हीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
प्रौढ भुंगेऱ्यांचे व्यवस्थापन
मशागतीय पद्धती
  • उन्हाळयातमध्ये जमिनीची खोल नांगर करावी. त्यामुळे जमिनितील सुप्तास्थेतील प्रौढ भुंगेरे पृष्ठभागावर  येतात. हे भुंगेरे सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे मरतात किंवा पक्षी खाल्यामुळे त्यांचा बंदोबस्त होतो.
  • नांगरणी केल्यानंतर उघडे पडलेले सुप्तास्थेतील प्रौढ भुंगेरे हाताने वेचून रॉकेलमिश्रीत पाण्यात मिसळून त्यांचा नायनाट करावा.
  • पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा. शेणखतामध्ये हुमणीच्या अळया आढळून आल्यास मिथाईल पॅराथिऑन 2 टक्के हे कीटकनाशक 1 किलो प्रति एक टन शेणखत या प्रमाणात मिसळावे.

यांत्रिक पध्दती
  • झाडाच्या फांदया हालवून खाली पडलेल्या भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावा. मार्च ते जून महिन्यात चांगला पाऊस पडताच सुर्यास्तानंतर सुप्तावस्थेतील प्रौ भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुलिंब इत्यादी झाडावर पाने खाण्यासाठी मिलनासाठी जमा होतात. झाडावर जमा झालेली भुंगेरे रात्री 8 ते 9 वाजता बांबुच्या काठीच्या साहाय्याने झाडाच्या फांदया हालवून खाली पाडावेत आणि ते हाताने गोळा करुन रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे. तसेच जो पर्यंत जमिनीतून भुंगेरे निघतात तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे.
  • प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्साचा वापर करुनदेखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतात. हे प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्स सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घर, झोपडी, विहीरीजवळ किंवा झाडावर लावावेत. सापळया जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. हे सापळे साधारपणे संध्याकाळी 7.30 ते 8.30 या कालावधीत लावावेत.
  • किटकनाशकांची फवारणी केलेल्या बाभूळ, कडुनिंब यांच्या फांदया शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावी. रात्रीला भुंगेरे फांदयावरील पाने खाल्यामुळे करुन जातील.


जैविक पध्दती
  • पक्षी, कुत्रे, डुक्करे हे भुंगेऱ्यांना खातात. त्यांचा वापर करावा.
रासायनिक पध्दती
  • जमिनीतून प्रौढ भुंगेरे निघण्याच्या कालावधीत बाभूळ, कडुनिंब, इत्यादी झाडावर किटकनाशकाची फवारणी करावी.
प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन अंडी घालण्याअगोदरच झाल्यामुळे अंळी पासून  पिकांना होणारे नुकसान टाळता येते.

अळीचे व्यवस्थापन
प्रौढ भुंगेरे पहिल्या पावसानंतर जमिनीत अंडी घालतात. अंडयातून अळी बाहेर निघते. ही अळी पिकांच्या मुळा कुरतडून त्यांचे नुकसान करते. यासाठी हुमणीच्या अळीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे.
  • पिकामध्ये शक्य असेल तोपर्यंत आंतरमशागत करावी. निंदणी आणि कोळपणी ही आंतरमशागतीची कामे केल्यास हुमणीच्या अळया पृष्ठभागावर येतात. या अळया पक्षी वेचून खातात किंवा सुर्यप्रकाशाच उष्णतेमुळे मरतात.
  • आंतरमशागत करतेवेळी शेतातील अळया हाताने वेचून नष्ट कराव्यात.
  • खरिपातील पीक काढणीनंतर शेतामध्ये खोल नांगरट करावी व पाळी मारावी. त्यामुळे जमिनीतील अळया पृष्ठभागावर आल्यानंतर सुर्यप्रकाशामुळे किंवा पक्षी वेचून खाल्यामुळे त्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल.
  • शेतामध्ये शक्य असल्यास वाहते पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीतील अळया काही प्रमाणात मरतात.
  • शेतातील तणांचा बंदोबस्त करावा.
  • पेरतेवेळी फोरेट 10 टक्के दाणेदार हे कीटकनाशक 25 किलो प्रति हेक्टरी  या प्रमाणात जमिनीत मिसळावे.
  • मेटारायझियम ॲनिसोप्ली या उपयुक्त बुरशीचा 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. ही बुरशी हुमणीच्या अळयांना रोगग्रस्त करते, त्यामुळे अळयांचा बंदोबस्त होतो.
  • हुमणीच्या अळीला रोगग्रस्त करणाया सुत्रकृमीचा वापर करावा.
  • फिप्रोनील 40 टक्के + इमिडाक्लोप्रीड 40 टक्के हे मिश्र कीटकनाशक 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या खोडाभोवती आळवणी करावी.
     
      हुमणी अतिशय हानीकारक म्हणून महत्वाची कीड असून सध्या मराठवाडयातील खरिप रब्बी पिकांच्या कमी उत्पादनासाठी मुख्य कारण आहे. ही कीड बहुभक्षी, वर्षभरात एकच जीवनक्रम, जमिनीत राहणारी असल्यामुळे केवळ एका पध्दतीचा वापर करुन व्यवस्थापन करता येणार नाही. हुमणीच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी प्रौढ भुंगेरे अळयांचे व्यवस्थापन एकात्मिक सामुदायिकरित्या सातत्याने करावे लागेल. शेतकरी, शास्त्रज्ञ शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने हुमणीचे योग्यरीत्या व्यवस्थापन करता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा