शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

गहू पिकावरील कीड व्यवस्थापन IPM in Wheat

 

गहू पिकावरील कीड व्यवस्थापन


 

            गहू हे पीक भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे अन्नधान्य पीक असून आपल्या देशाच्या अन्न सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. महाराष्ट्रामधील रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. या पिकावर लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत जवळपास २४ किडींच्या प्रादुर्भावाची नोंद झाली आहे. किडीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांचे वेळेवर व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. यासाठी किडीची ओळख करून योग्य पध्द्तीचा वापर केल्यास किडीमुळे होणारे नुकसान टाळून उत्पादकता वाढिता येते.

गहू पिकावरील किडी

  • खोडमाशी
  • गुलाबी खोडकिडा
  • मावा
  • लष्करी अळी
  • घाटेअळी
  • वाळवी किंवा उधई
  • तपकिरी कोळी
  • उंदीर

 

खोडमाशी

ही कीड घरमाशीप्रमाणे परंतु आकाराने लहान असते. हिचा आकार 3 मि.मी. असतो. खोडमाशी रंगाने काळपट राखाडी रंगाची असून तिच्या पृष्ठभागावर खालच्या बाजूने 4 ते 5 ठिपके असतात. पूर्ण वाढ झालेली अळी 10 ते 12 मि.मी. लांबीची असून ती तोंडाकडे निमुळती असते. तिचा रंग पिवळसर असतो व तिला पाय नसतात.

अंडयातून निघालेली अळी रोपाच्या बुडापर्यंत जाऊन खोडाला छिद्र पाडते व आत शिरुन वाढणा­या पोंग्यावर उपजिवीका करते. त्यामुळे सुरुवातीला मधला वाढणारा रोपाचा भाग पिवळसर पडणे व नंतर तो मरून जातो यालाच पोंगेमर असे म्हणतात. लहान रोपे या किडीच्या प्रादुर्भावामुळे पूर्णत: मरून जातात तर मोठया रोपांना बाजूने फुटवे फुटून उत्पादनात घट येते. ज्वारी, बाजरी, मका व इतर तृणधान्ये तसेच काही तृणवर्गीय गवतावर ही कीड उपजिवीका करते.



गुलाबी खोडकिडा

या किडीचा पतंग तपकिरी किंवा गवती रंगाचा व अळी गुलाबी रंगाची असते.  ती अंगाने मउ असून डोके काळे असते.  या किडीच्या प्रादुर्भावामुळे झाडाचा वाढणारा मधला भाग सुकून जातो.  अळी खोडात शिˉन आतील भागावर उपजिविका करते.  त्यामुळे रोपे सुकून जातात व त्यांना ओंब्या येत नाहीत. पीक फुलो-यात असताना जर प्रादुर्भाव झाला तर ओंब्यामध्ये दाणे भरत नाहीत व त्या पोचट व पांढ-या राहातात.



मावा

गव्हावर दोन प्रकारचा मावा दिसून येतो. एकाचा रंग पिवळसर तर दुस-याचा रंग निळसर हिरवा असतो.  या किडीची पिल्ले व प्रौढ पानातून व कोवळया शेंडयातून रस शोषण करतात.  तसेच आपल्या शरिरातून मधासारखा गोड व चिकट पदार्थ सोडतात त्यामुळे काळी बुरशी वाढते व पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.



लष्करी अळी

किडीच्या पतंगाची पुढील पंखाची जोडी भुरक्या तपकिरी रंगाची असून त्यावर ठिपके असतात. मागील पंखाची जोडी पांढुरक्या रंगाची असते. अळी हिरवट रंगाची, मजबूत बांध्याची असून शरीरावर पिवळसर लाल पट्टे दिसतात. अळया दिवसा पोंग्यामध्ये लपून बसतात. रात्री पोंग्यातून बाहेर पडतात आणि पाने कडेने कुरतडून खातात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. एका शेतातील संपूर्ण पीक फस्त करून लष्करासारखे समुहाने दुस­या शेतामध्ये जातात, म्हणून लष्करी अळी म्हणतात.



घाटेअळी

ही कीड कपाशीमध्ये अमेरीकन बोंडअळी, हरभ­यामध्ये घाटेअळी व तुरीमध्ये शेंगा पोख्रणारी अळी म्हणून ओळखली जाते. घाटेअळीचा पतंग मजबूत बांध्याचा फिकट पिवळा किंवा बदामी रंगाचा असतो. समोरच्या पंखावर मध्यभागी एक एक काळा ठिपका असतो व कडेच्या बाजूला गडद पट्टा असतो. मोठी अळी हिरवट, फिकट पिवळसर, तपकिरी किंवा काळी असते. अळीच्या शरिरावर दोन्ही कडांना तुटक तुटक गर्द करडया रेषा असतात. तसेच अळीच्या शरिरावर थोडे केस असतात. या किडीची अळी कणसातील दाणे खाऊन नुकसान करते, तसेच कोवळी पाने सुध्दा खाते.



वाळवी किंवा उधई

ही कीड पेरणी झाल्यावर आणि कधीकधी परिपक्वता जवळ येताच पिकाचे नुकसान करते. ते झाडाची मुळे, खोड व कुजलेल्या पेशी खातात.त्यामुळे रोपे मारतात आणि सहज बाहेर खेचले जातात. मोठ्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास ओंब्या पांढऱ्या दिसतात. जिरायत शेतात आणि अर्धवट कुजलेले शेणखत टाकलेल्या शेतात जास्त प्रादुर्भाव होतो.



तपकिरी कोळी

ही कीड अतिशय लहान, चमकदार तपकिरी ते काळ्या रंगाचे असून पाय फिकट पिवळे असतात. हे कोळी पानातून रस शोषण करतात. त्यामुळे पानावर पांढरट चट्टे दिसतात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल तर पाने लालसर तपकिरी होऊन वाळतात.

उंदीर

शेतातील पिकांचे उंदीर अतोनात नुकसान करतात. ते गव्हाच्या ओंब्या फस्त करतात तसेच बिळामध्ये नेउन ते साठवितात. तसेच शेतातील बांधावर, पाण्याच्या पाटात व इतर ठिकाणी शेतात उंदरांनी बिळे केल्यामुळे पिकांना मिळणारे पाणी बिळात झिरपून अनाठायी खर्च होतो. बांधाची व पाटाची नेहमी दुˉस्ती करावी लागते.



एकात्मिक कीड व्यवस्थापन

  • जमिनीची खोल नांगरट करून दोन ते तीन  कूळवणी करुन काडी, कचरा, धसकटे वेचून शेत साफ ठेवावे.
  • जमिनीच्या उताराला आडव्या सरी/सारे पाडून पेरणीसाठी तयारी करावी.
  • पिकाची फेरपालट करावी.
  • वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारुळे खणुन काढावीत व त्यातील राणीचा नाश करावा.
  • खोडकीडयामुळे प्रादुर्भावित झालेली झाडे उपटून नष्ट करावीत.
  • शेतात पक्षी थांबे २५ / हे. लावावे.
  • ५ % निंबोळी अर्कांची फवारणी करावी.
  • खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनीस या मित्र कीटकांनी परोपजीवीग्रस्त अंडी दीड लाख प्रति हेक्टर प्रमाणात उगवणीनंतर दोन आठवडयानी सुरूवात करून दर दहा दिवसाच्या अंतराने तीन ते चार वेळा सोडावीत.

 

गहू पिकावर शिफारस केलेली कीटकनाशके

कीटकनाशक

कीड

प्रमाण / १० लि. पाणी

वापर

थायामिथॉक्झाम ३० एफएस

वाळवी

३.३ मिली / किलो बियाणे

बीजप्रक्रिया करण्यासाठी

थायामिथॉक्झाम ७० डब्ल्यूएस

वाळवी, मावा

१.७५ मिली / किलो बियाणे

सायपरमेथ्रीन १० ईसी

खोडमाशी

११ मिली

फवारणीसाठी

क्विनालफॉस २५ ईसी

मावा

२० मिली

अळी, कोळी

३२ मिली

थायामिथॉक्झाम २५ डब्ल्यूजी

मावा

१ ग्रॅम

फिप्रोनील ०.३ जीआर

वाळवी

२० किलो / हे.

जमिनीत टाकण्यासाठी

 

उंदीर व्यवस्थापन

अ. विषारी आमिष तयार करणे

 

झिंक फॉस्फाईड

विषारी आमिष ठेवण्या अगोदर

§  ९८० ग्रॅम धान्य + २० ग्रॅम खाण्याचे तेल वापरावे.

विषारी आमिष

§  ९६० ग्रॅम धान्य + २० ग्रॅम खाण्याचे तेल + २० ते २५ ग्रॅम झिंक फॉस्फाईड

§  वरील सर्वाचे लाकडाच्या  काठीने मिश्रण करावे.

§  हातमोजे घालूनच हे विषारी आमिष तयार करावे वापरावे.

 

ब्रोमॅडिओलोन

§  ९६० ग्रॅम धान्य + २० ग्रॅम खाण्याचे तेल + २० ग्रॅम ब्रोमॅडिओलोन

§  लाकडाच्या काठीने वरील सर्वांचे मिश्रण करावे.

 

ब. विषारी आमिष ठेवणे

बिळामध्ये विषारी आमिष ठेवणे

§  आमिष ठेवण्याच्या अगोदरच्या दिवशी बिळे चिखलाने बुजवून घ्यावेत.
जी  बिळे दुसऱ्या दिवशी उतरलेली दिसतात त्यामध्ये विषारी  आमिष ठेवावे.

§  झिंक फॉस्फाईड

§  सुरूवातीला ते दिवस केवळ आमिष (झिंक फॉस्फाईड मिसळता) ते १० ग्रॅम प्रति बिळ ठेवावे.

§  त्यानंतर झिंक फॉस्फाईड मिसळलेले विषारी आमिष ते १० ग्रॅम प्रति बिळ  केवळ एकच दिवस ठेवावे.

§  ब्रोमॅडिओलोन

§  ब्रोमॅडिओलोन मिसळलेले विषारी आमिष १० ते १५ ग्रॅम प्रति बिळ लगेच वापरावे. (ब्रोमॅडिओलोन मिसळता सुरुवातीला   आमिष ठेवण्याची गरज नाही).

 

एखाद्या जागेवर विषारी आमिष ठेवणे

§  एखाद्या जागेवर विषारी आमिष ठेवण्यासाठी विशेष प्रकारचे  डबे किंवा उपकरण  याचा वापर करावा.

§  झिंक फॉस्फाईड

§  झिंक फॉस्फाईड मिसळता केवळ आमिष सुरुवातीला ते दिवस ५० ते १०० ग्रॅम / जागा ठेवावे.

§  त्यानंतर झिंक फॉस्फाईड मिसळलेले विषारी आमिष ५० ते १०० ग्रॅम / जागा केवळ एकच दिवस किंवा रात्र ठेवावे.

 

§  ब्रोमॅडिओलोन
ब्रोमॅडिओलोन मिसळलेले विषारी आमिष ५० ते १०० ग्रॅम / जागा ठेवावे.

§  हे आमिष उंदराने खाण्याच्या प्रमाणानुसार ते दिवस ठेवावे. (ब्रोमॅडिओलोन मिसळता सुरुवातीला केवळ आमिष ठेवण्याची गरज नाही).

§  शेतामध्ये विषारी आमिष ठेवण्याच्या जागा : १५ ते २० जागा / हेक्टरी
घरामध्ये याची संख्या  क्षेत्रानुसार बदलेल.

§  झिंक फॉस्फाईड एकदा वापरल्यानंतर  दुसऱ्यांदा वापर ५० ते ६० दिवसांनी करावा.

 

क. अल्युमिनियम फॉस्फाईड

§  केवळ शेतामध्येच वापर करावा.

§  घरामध्ये किंवा बंदिस्त ठिकाणी वापर करू नये.

§  १२ ग्रॅमच्या गोळ्या स्वरूपातच उपलब्ध असलेल्याची शिफारस आहे.

§  एका बिळासाठी एक गोळी वापरावी.

§  गोळ्या बिलाच्या आत ढकलून बिळ चिखलाने बंद करावे.

 

शेतामध्ये उंदीर व्यवस्थापनाचे वेळापत्रक

 

दिवस

कामे

बिळे चिखलाने बुजविणे किंवा घूस याची बिळे उकरणे. आमिष, उंदीरनाशक मजुरांची संख्या ठरवावे. तण झुडपे काढावे.

जिवंत बिळे ओळखणे. उंदीरनाशक मिसळता केवळ ठेवावे.

झिंक फॉस्फाईड चे विषारी आमिष ठेवावे.

मेलेले उंदीर जमा करून पुरावे.

बिळे चिखलाने बुजविणे किंवा  घूस याची बिळे उकरणे.

ब्रोमॅडिओलोन चे  विषारी आमिष ठेवावे.

 

            अशा प्रकारे गहू पिकावरील किडीचे व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान टाळून शेतकऱ्याना चांगले उत्पादन मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन