शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

मिरची

  • मिरची हे प्रमुख भाजीपाला पीक
  • कमी उत्पादन व कमी प्रतीचे उत्पादन
  • ५१ कीटक व 2 कोळी या प्रजातीचा मिरची पिकावर प्रादुर्भाव
  • ३४-७७ टक्क्यापर्यंत नुकसान

मिरचीवरील प्रमुख किडी
  • फुलकिडे
  • पांढरी माशी
  • मावा
  • फळ पोखरणारी अळी
  • पिवळे कोळी
  • लाल कोळी

फुलकिडे
      मिरचीवरील ही प्रमुख कीड आहे. या किडीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळून येतो. त्यामुळे एकूण उत्पादनापैकी 25-55 टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते. प्रौढ 2 मि.मी. लांब असून समोरील पंख दुभंगलेले असतात. रंगाने फिकट पिवळा किंवा जवळपास पांढरट रंगाचा दिसून येतो तर आकार लांबट असतो. अंडी पांढरट ते फिकट पिवळसर असून वरच्या बाजूस हे किंचित निमुळते असतात तर यांचा आकाचवळीच्या बियासारखा असतो. पिल्ले फिकट पिवळया रंगाची असतात. कोष पिवळसर रंगाचा असून, त्यावर डोळयांच्या जागी लाल रंग दिसून येतो.
      पिल्ले व प्रौढ पाने खरवडुन त्यांतून येणारा रस शोष करतात. त्यामुळे पानांवर सुरवातीस पांढरे तपकिरी चट्टे दिसून येतात. अशी पाने शक्यतो पुढे गळुन पडतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास झाडांची वाढ खुंटते व कळी, फुल व पानांमध्ये खुप मोठया प्रमाणात मुरगळण्याची लक्षणे दिसून येतात जाल्याच शेतकरी चुरडा मुरडा असे देखील म्हणतात. प्रामुख्याने झाडाचा वाढता शेंडा व नविन येणारे पाने यावर फुलकिडयांचा प्रादुर्भाव जास्त असतो. पावसाळ्याच्या शेवटी कोरडे हवामान असल्यास फुलकिडे मोढ्या प्रमाणात आढळतात



व्यवस्थापन
आर्थिक नुकसानीची पातळी : 2 फुलकिडे प्रति झाड
  • कीप्रतिकारक किंवा सहनशील वा जसे पुसा ज्वाला किंवा फुले ज्योती यांचा वापर करावा.
  • निरोगी रोतयार करण्यासाठी संरक्षित पॉलीहाऊस मध्ये प्लास्टीक ट्रे किंवा प्रौट्रेचा वापर करावा.  
  • मिरचीसोबत शेवरीची लागवड केल्यास फुलकिडयांची संख्या कमी होण्यास मदत होते.
  • मिरचीच्या पिकाभोवती दोन ओळी मक्याच्या प्रति र्धा एकर लावाव्यात.
  • मिरची आणि कांदा या पीक पध्दतीचा वापर तसेच फक्त मिरचीवर मिरचीचे पीक घेणे टाळावे.
  • मिरचीच्या रोपावर हलकेसे पाणी शिंपडल्यास फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • अति प्रादुर्भावग्रस्त झाड किंवा रोपे  काढून किडीस नष्ट करावी.
  • जैविक परभक्षी कीटक जसे की कोळी व ढेकूण यांचे जतन करावे.
  • निंबोळी पेंड @ 100 किलो प्रति एकरी या प्रमाणात दोनदा (रोप लावतेवेळी व त्यानंतर एक महिन्यानंतर) विभागून दयावी.
  • इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यु एस @ १०-१५ ग्रॅम किंवा थायामिथोक्झाम ७० डब्ल्यु एस @ ३० एफ एस  @ ७ मिली प्रति किलो बियाणे
  • कार्बोफ्युरोन ३ जी @ ३३ किलो किंवा फोरेट १० जी @ १० किलो / हेक्टर जमिनीत मिसळावे.
फवारणीसाठी कीटकनाशके
कीटकनाशके
मात्रा / हेक्टरी / 500 लिटर पाणी
फवारणीनंतर पीक काढणीचा कालावधी (दिवस)
इमामेक्टीन बेन्झोएट 5 एस.जी. किंवा
200  ग्रॅम
3
स्पिनोसॅड 45 एस.एल. किंवा
160  मि.ली
3
फिप्रोनील 5 एस.सी. किंवा
1000 मि.ली
7
सायनॅनट्रॅनीलीप्रोल 10.26 ओ. डी. किंवा
600 मि.ली
3
थायाक्लोप्रीड 21.7 एस.सी. किंवा
225 मि.ली
5
फेनप्रोपॅथ्रीन 30 ई.सी. किंवा
170 मि.ली
7
लॅमडा साहॅलोथ्रीन 4.9 एस.सी. किंवा
500 मि.ली
5
लॅमडा साहॅलोथ्रीन 5 ई.सी. किंवा
300 मि.ली.
5
इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के + अॅसीटामाप्रीड 7.7 टक्के एस. सी.
400 मि.ली.
5

मावा
      प्रौढ 1 ते 4 लांबीची असून यांच्या शरिराव शेवटी दोन शिंगे असल्याचे दिसून येते, शरिराने ही अत्यंत नाजूक कीड आहे. पिल्ले व प्रौढ पानाच्या मागील बाजुस राहून पानातून रस शोषण करतात. त्यामुळे पाने आकसतात. प्रादुर्भाव तीव्र असल्यास झाड मलूल व चिकट दिसते व त्यांची वाढ खुंटते. शिवाय ही कीड झाडावर चिकट द्रव पदार्थ सोडते ज्यावर काळी बुरशी वाढून वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रकिया मंदावते.
व्यवस्थापन
  • इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यु एस @ १०-१५ ग्रॅम किंवा थायामिथोक्झाम ७० डब्ल्यु एस @ ३० एफ एस  @ ७ मिली प्रति किलो बियाणे
  • कार्बोफ्युरोन ३ जी @ ३३ किलो किंवा फोरेट १० जी @ १० किलो / हेक्टर जमिनीत मिसळावे.




फवारणीसाठी कीटकनाशके
कीटकनाशके
मात्रा / हेक्टरी / 500 लिटर पाणी
फवारणीनंतर पीक काढणीचा कालावधी (दिवस)
कार्बोसल्फान 25 ई.सी. किंवा
800 मि.ली
8
ऑक्झीडिमॅटोन मिथाईल 25 ई.सी. किंवा
1600 मि.ली
--
फिप्रोनील 5 एस.सी.
1000  मि.ली
7

पांढरी माशी
      प्रौढ आकाराने अत्यंत लहान असून अंगावर मेणाचे आवरण असते. संपूर्ण शरिर पिवळया रंगाचे असून पंख पांढऱ्या रंगाचे असतात. अंडी अर्धगोलाकार असून रंगाने फिकट पिवळया रंगाची असतात. बाल्यावस्था आकाराने लंबगोलाकर असून पानाच्या खालील भागास चिटकून राहणारी असते.
      पिल्ले व प्रौढ ही पानाच्या खालच्या भागातून तसेच नवती मधून देखील रस शोषण करते. त्यामुळे पानाचा व एकूच नविन नवतीमध्ये आकारात बदल दिसून येते याशिवाय ही कीड पानांवर चिकट पदार्थ देखील सोडते, ज्यावर काळया बुरशी वाढून वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. तसेच मिरचीवरील चुरडामुरडा या रोगाचा प्रसारदेखील करते. साधारणपाने 300 सें. तापमान व जास्त आर्द्रता हे वातावरण पोषक आहे.

व्यवस्थापन
  • निरोगी रोतयार करण्यासाठी संरक्षित पॉलीहाऊस मध्ये प्लास्टीक ट्रे किंवा प्रौट्रेचा वापर करावा.  किंवा गादी वाफ्यावर रोपे तयार करावी. हे वाफे कीटक प्रतिबंधक जाळी (४० मेश) ने झाकावे.
  • रसशोषक किडींना मुख्य पिकांवर येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी पीक लागवडीपूर्वी १० ते १५ दिवस अगोदर मिरची पिकाच्या चहूबाजूला २-३ ओळी मका किंवा ज्वारी किंवा बाजरीच्या पेराव्यात.
  • पिवळ्या चिकट सापळ्याचा वापर करावा.
फवारणीसाठी कीटकनाशके
कीटकनाशके
मात्रा / हेक्टरी / 500 लिटर पाणी
फवारणीनंतर पीक काढणीचा कालावधी (दिवस)
फेनप्रोपॅथ्रीन 30 ई.सी. किंवा
170 मि.ली
5
पायरीप्रॉक्सीफेन 5 ई.सी. + फेनप्रोपॅथ्रीन 15 ई.सी.
500 मि.ली
7

पिवळे / लाल कोळी
पिवळे कोळी : या बहुभक्षी किडीचा प्रादुर्भाव फेब्रुवारी ते मे आणि ऑक्टोबर ते नोव्हेबर मध्ये महाराष्ट्रात मिरचीवर दिसून येतो. प्रामुख्याने तापमान 32 ते 350 सें. व प्रखर सूर्यप्रकाश या किडीसाठी पोषक असून अती पाऊस व वातावरणातील वाढीव आर्द्रता ही घातक असल्याचे दिसून आले आहे. प्रौढ अति लहान, अंडाकृती, पिवळे असून पायाच्या चार जोड्या असतात. अंडी अंडाकृती असून रंगाने पांढरे असतात. बाल्यावस्था पारदर्शक ते पांढऱ्या रंगाची असून आकाराने अत्यंत लहान असते.
      प्रादुर्भाव प्रामुख्याने रोपांच्या वरच्या बाजूस आढळून येतो. पिल्ले व प्रौढ ही वाढणा­या भागातुन व नवतीमधून रस शोष करतात. ज्यामुळे या भागातील पाने ही सुरवातीला आकसतात व त्यांचा आकार हा बोटीप्रमाणे होतो. तसेच नविन कळया, फुले यांची गळ होते. तर खोडाची वाढ खुंटून आकार वेडावाकडा होतो. तर फळांचा देखील आकार कमी होऊन त्यावर चट्टे देखील दिसून येतात.
लाल कोळी
      प्रादुर्भाव प्रामुख्याने उष्ण हवामानामध्ये जेथे धुळ जास्त असते अशा ठिकाणी जास्त असल्याचे आढळून आले आहे. जर वातावरण व अन्नाचा योग्य पुरावठा असेल तर हया किडीची एक पिढी एका आठवडयापेक्षा कमी वेळेत पूर्ण होते. प्रौढ सुरवातीला पिवळसर हिरवे असून पाठीवर दोन गडद ठिपके असतात. नंतर रंग लालसर नारंगी होतो. बाल्यावस्था पिवळसर हिरव्या रंगाचे असतात. अंडी ही गोलाकार व पारदर्शक असतात. नवीन अंडी ही छोटी दवबिंन्दु सारखी दिसतात. तर उबण्यापुर्वी यांचा रंग पिवळसर  होतो.
      ही कीड ही पानाच्या खालच्या बाजूस पुंजक्यामध्ये राहून तिचे जाळे विते व त्यात राहून उपजिविका करते. ज्यामुळे पानांवर पांढरे चट्टे दिसून येतात. नंतर अशी पाने पूर्णपणे वाळून गळून पडतात. प्रादुर्भावग्रस्त पाने खालच्या बाजुला वळलेले दिसून येतात तर सुरवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास झाडाची वाढ खुंटते तसेच त्यावर फुल व फळधारणा होत नाही.

व्यवस्थापन
  • आर्थिक नुकसानीची पातळी : एक कोळी प्रति पान
  • कीड प्रतिकार किंवा सहनशील वा जसे पुसा ज्वाला किंवा फुले ज्योती यांचा वापर करावा.
  • पाणी व अन्नद्रवाच्या शिफारशी मात्रेत वापर केल्यास या किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
  • मिरचीच्या पिकाभोवती दोन ओळी मक्याच्या  प्रति र्धा एकर लावाव्यात.
  • जैविक परभक्षी कीटक जसे कोळी व ढेकूण यांचे जतन करावे.
  • निंबोळी अर्क 4 टक्के प्रति 10 दिवसाच्या अंतराने फवारल्यास प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
रासायनिक पद्धती
  • फोरेट १० जी @ १० किलो / हेक्टर जमिनीत मिसळावे.
फवारणीसाठी कीटकनाशके
कीटकनाशके
मात्रा / हेक्टरी / 500 लिटर पाणी
फवारणीनंतर पीक काढणीचा कालावधी (दिवस)
डायफेनथ्युरॉन 50 डब्लयु.पी. किंवा
600 ग्रॅम
3
क्लोरफिन्यापायर 10 ई.सी. किंवा
750 मि.ली
5
फिनॅझाक्वीन 10 ई.सी. किंवा
1250 मि.ली
10
स्पायरोमेसीफेन 22.9 ए.सी. किंवा
400 मि.ली
7
इमामेक्टीन बेन्झोएट 5 एस.जी. किंवा
200 ग्रॅम
3
फेनपायरॉक्झीमेट 5 ई.सी. किंवा
600 मि.ली
7
हेक्झाथायझॉक्स 5.45 एस.सी. किंवा
240 मि.ली
3
मिलबेमेक्टीन 1 ई.सी. किंवा
325 मि.ली
7
प्रॉपारगाईट 57 ई.सी.
1500 मि.ली
7

फळ पोखरणारी अळी
      ही बहुभक्षी कीड आहे. या किडीचा पतंग पिवळसर तपकिरी असून समोरील पंखावर काळा ठिपका असतो. अंडी घुमटाकार असून पांढरट पिवळी असतात. पूर्ण वाढलेली अळी 30 ते 35 मि.मी. असते. तर रंगामध्ये खुप विविधता आढळुन येते. ढोबळ मानाने सुरवातीस तपकिरी असते तर पुढे हिचा रंग हिरवट होत असल्याचे दिसून येते. कोष तपकिरी रंगाचे असतात.
      सुरवातीच्या अवस्थेमध्ये अळी ही पाने व फुले व रोपाच्या शेंडयावर किंवा खोडावर आपली उपजिविका करते. नंतर ती फळामध्ये गोल छिद्र करुन त्यात आपले डोके खुपसून तील भाग खाते. प्रादुर्भाव तीव्र असल्यास फळामधील पूर्ण भाग खाल्लेला दिसून येतो. 
व्यवस्थापन
  • शेतात मागील पिकाचे अवशेष राहणार नाहीत याची काळजी घ्यावी व स्वछ लागवड पध्दतीचा अवलंब करावा.
  • मिरची पिकासोबत 5:1 किंवा 4:1 या प्रमाणात चवळी, मका, कोथींबीर किंवा उडीद यांचे अंतर पिक घ्यावे.
  • पिकाची फेरपालट करावी.
  • झेंडू या सापळा पिकाची लागवड करावी. (१०० झाडे / एकर किंवा मिरचीच्या १८ ओळीनंतर १ ओळ) . झेंडूची रोपे ४५ दिवसाची लावावीत.
  • मुख्य पिकात पक्षी थांबे व कामगंध सापळयांचा वापर करावा.
  • निंबोळी अर्क 5 टक्के फवारणी
  • सुरवातीच्या अवस्थेमध्ये एचएनपीव्ही 250 एल ई प्रति हेक्टर संध्याकाळच्या वेळेस फवारल्यास प्रभावी नियंत्रण होते.
  • ट्रायकोग्रामा या परोपजिवी किटकाची 50,000 प्रौढ / एकरी / आठवडा या प्रमाणात फुल धारणेपासून ते पीक काढणेपर्यंत सोडावे.
  • पिकातील नैसर्गिक मित्र किटकाचे जतन करावे.

फवारणीसाठी कीटकनाशके

कीटकनाशके
मात्रा / हेक्टरी / 500 लिटर पाणी
फवारणीनंतर पीक काढणीचा कालावधी (दिवस)
सायनॅनट्रॅनीलीप्रोल 10.26 ओ. डी. किंवा
600 मि.ली
3
क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल 18.5 एस.सी. किंवा
150  मि.ली
3
फ्ल्युबेंडामाईड 39.35 एस.सी. किंवा
100  मि.ली
7
इमामेक्टीन बेन्झोएट 5 एस.जी. किंवा
200  ग्रॅम
3
स्पिनोसॅड 45 एस.जी. किंवा
160  मि.ली
3
फिप्रोनील 5 एस.सी.किंवा
1000 मि.ली
7
इन्डोक्सोकार्ब 14.5 एस.सी. किंवा
350 मि.ली
5
थायोडायकॉर्ब 75 डब्लयु.जी. किंवा
625 ग्रॅम
6
लुफेनुरॉन 5.4 ई.सी. किंवा
600 मि.ली
5
नोव्हालुरॉन 10 ई.सी. किंवा
375 मि.ली
3
फ्ल्युबेंडामाईड 19.92 टक्के + थायक्लोप्रीड 19.92 टक्के किंवा
200 मि.ली
5
इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के + अॅसीटामाप्रीड  7.7 एस.सी. किंवा
400 मि.ली
5
पायरीप्रॉक्सीफेन 5 ई.सी + फेनप्रोपॅथ्रीन 15 ई.सी
500 मि.ली
7


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन