हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्याचे व्यवस्थापन
§ बऱ्याच ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस झाल्यामुळे हुमणी
किडीचे प्रौढ भुंगेरे निघत आहेत. तसेच यापुढे होणाऱ्या पावसामुळे हे भुंगेरे निघत
राहणार आहेत.
§ सूर्य मावळल्यानंतर सायंकाळी हे प्रौढ भुंगेरे
जमिनीतून निघून कडूनिंब, बाभूळ, बोर, चिंच
इत्यादी झाडावर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी मोठ्या संख्येने जमा होतात. रात्रभर ते झाडावर
राहतात व पहाटे परत
जमिनीमध्ये लपून राहतात.
§ रात्रीला नर व मादी भुंगेऱ्याचे मीलन होऊन मादी
जमिनीमध्ये अंडी घालते. या अंड्यातून निघणाऱ्या अळ्या खरीप हंगामातील
पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन करण्याची ही वेळ अतिशय योग्य
आहे.
व्यवस्थापन
- झाडाच्या फांदया हालवून खाली पडलेल्या भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावा. झाडावर जमा झालेली भुंगेरे रात्री ८ ते ९ वाजता बांबुच्या काठीच्या साहाय्याने झाडाच्या फांदया हालवून खाली पाडावेत आणि ते हाताने गोळा करुन रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.
- प्रकाश सापळे किंवा बल्ब किंवा पेट्रोमॅक्साचा वापर करुनदेखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतात. हे प्रकाश सापळे किंवा बल्ब किंवा पेट्रोमॅक्स सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घर, झोपडी, विहीरीजवळ किंवा झाडावर लावावेत. सापळयात जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. हे सापळे साधारणपणे संध्याकाळी ७.०० ते ९.०० या कालावधीत लावावेत.
हे उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करणे गरजेचे आहे. तसेच जो पर्यंत जमिनीतून भुंगेरे निघतात तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा