गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन
कपाशीवरील फुलकिड्याचे तात्काळ व्यवस्थापन करा
सध्या कपाशीवर फुलकिडे या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीस सध्याचे वातावरण अतिशय पोषक आहे, त्यामुळे या किडीची संख्या कमी कालावधीत झपाट्याने वाढते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कपाशीवरील या किडीच्या व्यवस्थापनासाठी तात्काळ उपाययोजना करावी.
नुकसानीचा प्रकार : प्रौढ फुलकिडे आणि पिल्ले कापसाच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात व प्रथम तो भाग पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने, फुले व कळया आकसतात, झाडाची वाढ खुटंते. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास पाने व झाड काळपट-तपकिरी दिसतात. कोरडवाहू कपाशीवर या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवाडयापासून सुरु होतो. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाडयात सर्वात जास्त प्रादुर्भाव आढळून येतो. ही कीड कापसाशिवाय मिरची, द्राक्ष, तोंडली, दुधी भोपळा, पेरु इत्यादी पिकांनासुध्दा उपद्रव करते.
जीवनक्रम : पूर्ण वाढ झालेली फुलकिडयाची मादी पानाच्या पेशीत अंडी देते. सर्वसाधारणपणे ही अंडी पानाच्या मागच्या भागात असतात. एक मादी ३० ते ४० अंडी देते. अंडी आकाराने खूप लहान असतात. २ ते ५ दिवसात अंडयातून पिल्ले बाहेर पडतात. पिल्ले ही पांढरट ते फिक्कट पिवळसर रंगाची असतात. पिल्लावस्था ४ ते ६ दिवसांची असते. ती प्रौढ फुलकिडयासारखीच दिसतात पण त्यांना पंख नसतात. पिल्लाची शेवटची अवस्था जवळपास २० तास जमिनीत कोषावस्थेप्रमाणे निश्चल राहते. पिल्ले तीन वेळा कात टाकून ५ ते ६ दिवसात प्रौढ अवस्थेत पोहोचतात. पूर्ण वाढ झालेला फुलकिडा १० ते १५ दिवस जगतो. किडीच्या वर्षामध्ये ३ ते ४ पिढया पूर्ण होतात.
आर्थिक नुकसानीची संकेत पातळी : १० फुलकिडे / पान
व्यवस्थापन
शिफारस केलेली कीटकनाशके
|
कीटकनाशक |
प्रमाण / १० लि. पाणी |
|
फ्लोनीकॅमीड ५० डब्ल्युजी किंवा |
३ ग्रॅम |
|
स्पायनेटोरम ११.७ एससी किंवा |
८ मिली |
|
बुप्रोफेझीन २५ एससी किंवा |
२० मिली |
|
डायफेन्थुरॉन ५० डब्ल्युपी किंवा |
१२ ग्रॅम |
|
फिप्रोनील ५ एससी किंवा |
३० मिली |
|
फिप्रोनील १८.८७ एससी किंवा |
७.५ मिली |
|
डायनोटेफ्युरॉन २० एसजी |
३ ग्रॅम |
विशेष सूचना