मंगळवार, १० जानेवारी, २०१७

वांग्यावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन



वांग्यावरील प्रमुख किडी
  • शेंडा व फळ पोखरणारी अळी
  • पांढरी माशी
  • मावा
  • तुडतुडे
  • पाने गुंडाळणारी अळी
  • पाने खाणारे भुंगेरे
  • खोडकिडा
  • लाल कोळी


शेंडा व फळे पोखरणारी अळी : हया किडीचे पतंग लहान व सुंदर असते.  त्याचे पंख स्वच्छ पांढरे असुन त्यावर गुलाबी व पींगट ठिपके असतात, अळया गुलाबी छटांच्या असतात. हया किडीच्या अळया पानाच्या देठातून पोखरुन आत शिरतात व देठाचा आतील भाग गोलाकाप देऊन खातात. त्यामुळे पान मलुल होते,  त्याचप्रकारे झाडाची कोवळी शेंडीसुध्दा पोखरल्या जातात. त्यामुळे शेंडे मलुल होऊन खाली झुकलेले दिसतात.  हयाच अळया पुढे फुले व फळे पण पोखरतात.  एक अळी 4 ते 6 फळांचे नुकसान करते. यांनी आत घुसतांना केलेले छिद्र फार लहान असते, परंतु फळात आत शिरल्यानंतर आतील बराच भाग पोखरुन फळ खाण्यास अयोग्य करते.  शेंडयात अथवा फळा शिरलेल्या अळया बाहेर येऊन दुस­या शेंडयात अथवा फळात जातात.





पांढरी माशी : ही कीड विविध भाजीपाला पिकावर व इतर पिकावर आढळून येते. प्रौढ आकाराने अत्यंत लहान असून अंगावर मेणाचे आवरण असते. संपूर्ण शरिर पिवळया रंगाचे असून पंख पांढऱ्या रंगाचे असतात. अंडी अर्धगोलाकार असून रंगाने फिकट पिवळया रंगाची असतात. बाल्यावस्था आकाराने लंबगोलाकर असून पानाच्या खालील भागास चिटकून राहणारी असते. या किडीचे पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषून घेतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने पिवळी पडतात. याशिवाय ही कीड शरीरातून गोड चिकट द्रव पदार्थ बाहेर टाकते. हया द्रवावर काळया बुरशीची वाढ होते, त्यामुळे झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर बाधा येते. परिणामी झाडाची वाढ खुंटते व उत्पन्नावर परिणाम होतो.




मावा : प्रौढ 1 ते 4 लांबीची असून यांच्या शरिराव शेवटी दोन शिंगे असल्याचे दिसून येते, शरिराने ही अत्यंत नाजूक कीड आहे. या किडीचे प्रौढ व पिल्ले पानातून तसेच कोवळया भागातून रस शोषण करते. याशिवाय ही कीड आपल्या शरीरातून मधासारखा गोड व चिकट पदार्थ पानावर सोडत असल्यामुळे त्यावर काळया बुरशीची वाढ होते व झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व उत्पन्नावर गंभीर परिणाम होतो.



तुडतुडे : या किडीचे पिल्ले व प्रौढ सहसा पानाच्या खालच्या पृष्ठभागावर राहून पेशींमधील रस शोषण करतात. रस शोषण करताना त्यांच्या तोंडाव्दारे विषारी लाळ झाडाच्या पेशीत सोडतात. प्रादुर्भावग्रस्त पाने पिवळसर आणि चुरडल्यासारखी वाटतात. जर प्रादुर्भाव मोठया प्रमाणात असेल तर पाने विटकरी लाल रंगाचे कडक आणि चुरडल्यासारखे दिसतात.



पाने गुंडाळणारी अळी : ही अळी काळसर असून तिच्या शरीरावर पांढरे ठिपके असतात. ही अळी पाने गुंडाळून आतील भाग खाऊन उपजीविका करते.



पाने खाणारे भुंगेरे :  ही कीड झाडाच्या पानातील हरितद्रव्य खातात आणि पानाची चाळणी करतात.  त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते.  हया किडीच्या जीवनक्रमाविषयी तसेच व्यवस्थापनाविषयीची माहिती टोमॅटो या पिकात सविस्तर दिली आहे.


खोडकिडा : हया किडीची अळी जमिनीलगत मुख्य खोड पोखरुन त्यातील आतील भाग खात असते.  त्यामुळे झाड प्रथम कोमेजते व नंतर वाळून जाते.  ही किड मार्च ते ऑक्टोंबर महिन्यात कार्यक्षम असते आणि अळी हिवाळयात झाडाच्या खोडात सुप्त अवस्थेत जाते.

लाल कोळी : प्रौढ सुरवातीला पिवळसर हिरवे असून पाठीवर दोन गडद ठिपके असतात. नंतर रंग लालसर नारंगी होतो. बाल्यावस्था पिवळसर हिरव्या रंगाचे असतात. अंडी ही गोलाकार व पारदर्शक असतात. नवीन अंडी ही छोटी दवबिंन्दु सारखी दिसतात. तर उबण्यापुर्वी यांचा रंग पिवळसर  होतो. ही कीड ही पानाच्या खालच्या बाजूस पुंजक्यामध्ये राहून तिचे जाळे विते व त्यात राहून उपजिविका करते. ज्यामुळे पानांवर पांढरे चट्टे दिसून येतात. नंतर अशी पाने पूर्णपणे वाळून गळून पडतात. प्रादुर्भावग्रस्त पाने खालच्या बाजुला वळलेले दिसून येतात तर सुरवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास झाडाची वाढ खुंटते तसेच त्यावर फुल व फळधारणा होत नाही.




एकात्मिक कीड व्यवस्थापन
  • उन्हाळयामध्ये खोल नांगरट केल्यास किडींच्या जमिनीतील सुप्तावस्था उन्हामुळे व पक्षी खाऊन नष्ट होतील.
  • नत्रयुक्त खताचा अतिरीक्त वापर करु नये.
  • प्रादुर्भावग्रस्त पाने, शेंडा, फळे आतील किडीसह गोळा करून नष्ट करावी.
  • पाने खाणा­या भुंग्याचे अंडीपुज, अळया जमा करून त्याचा बंदोबस्त करावा.
  • पांढ­या माशीसाठी पिवळे चिकट सापळे १० /हे. लावावेत.
  • कामगंध सापळयाचा (५ प्रति हेक्टरी) वापर करावा.
  • ढालकिडे, क्रायसोपा, सिरफिड, कोळी, भक्षक ढेकुण इत्यादी परभक्षी व इतर परोपजीवी किटकांचे संवर्धन करावे.
  • टक्के निंबोळी अर्काची फवारणी केल्यास सुरुवातीच्या रस शोषण करणा­या किडींचे नियंत्रण होईल.




फवारणीसाठी किटकनाशके

कीड
कीटकनाशक
मात्रा / १० लि. पाणी
शेंडा व फळ पोखरणारी अळी
अझाडिरॅक्टीन १०००० पीपीएम किंवा
२० मिली
अझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम किंवा
५० मिली
क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एससी किंवा
४ मिली
क्लोरपायरीफॉस २० ईसी किंवा
२० मिली
सायपरमेथ्रीन १० ईसी किंवा
११ मिली
सायपरमेथ्रीन २५ ईसी किंवा
३ मिली
डेल्टामेथ्रीन २.८ ईसी किंवा
८ मिली
इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी किंवा
४ ग्रॅम
फेनप्रोपॅथ्रीन 30 ईसी किंवा
५ मिली
फेनवलरेट 20 ईसी किंवा
८ मिली
लॅमडा साहॅलोथ्रीन 5 ईसी किंवा
६ मिली
थायाक्लोप्रीड 21.7 एससी किंवा
१५ मिली
थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा
१३ ग्रॅम
बीटासायफ्लूथ्रीन ८.४९ % + इमीडाक्लोप्रीड १९.८१ % ओडी किंवा
४ मिली
सायपरमेथ्रीन ३ % + क्विनालफॉस २० %  ईसी किंवा
७ मिली
डेल्टामेथ्रीन १ % + ट्रायझोफॉस ३५ % ईसी किंवा
२० मिली
पायरीप्रॉक्झीफेन ५ % + फेनप्रोपॅथ्रीन १५ %   ईसी
१० मिली
पांढरी माशी
डायफेनथुरॉन ५० डब्ल्युपी किंवा
१२ ग्रॅम
फेनप्रोपॅथ्रीन ३० ईसी किंवा
५ मिली
थायमिथॉक्झाम २५ डब्ल्युजी किंवा
४ ग्रॅम
पायरीप्रॉक्झीफेन ५ % + फेनप्रोपॅथ्रीन १५ %   ईसी
१० मिली
मावा
फेनवलरेट २० ईसी किंवा
८ मिली
फोरेट १० सीजी किंवा
१५ किलो/हे.
बीटासायफ्लूथ्रीन ८.४९ + इमीडाक्लोप्रीड १९.८१ ओडी किंवा
४ मिली
डेल्टामेथ्रीन १ % + ट्रायझोफॉस ३५ % ईसी
२० मिली
तुडतुडे
सायपरमेथ्रीन 25 ईसी किंवा
३ मिली
फोरेट १० सीजी किंवा
१५ किलो/हे.
बीटासायफ्लूथ्रीन ८.४९ + इमीडाक्लोप्रीड १९.८१ ओडी किंवा
४ मिली
डेल्टामेथ्रीन १ % + ट्रायझोफॉस ३५ % ईसी
२० मिली
पाने खाणारे भुंगेरे
अझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम किंवा
५० मिली
सायपरमेथ्रीन 25 ईसी किंवा
३ मिली
डेल्टामेथ्रीन १ % + ट्रायझोफॉस ३५ % ईसी
२० मिली
कोळी
डायकोफॉल 18.5 ईसी किंवा
२७ मिली
फेनाझॅक्वीन 10 ईसी किंवा
२५ मिली
फेनप्रोपॅथ्रीन 30 ईसी किंवा
५ मिली
फ्ल्युमाईट 20 एससी किंवा
८ मिली
प्रोपारगाईट 57 ईसी किंवा
२० मिली
स्पायरोमेसीफेन 22.9 एससी किंवा
८ मिली
इटाक्झाझोल १० ईसी
८ मिली

  • रील प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा