शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

उडीद व मूग

उडीद मूग पिकावरील प्रमुख किडी
  • शेंगा पोखरणारी हिरवी अळी
  • उंटअळी
  • मावा
  • पाने खाणारी सोटअळी
  • तंबाखुवरील पाने खाणारी अळी
  • फुलकिडी
  • तुडतुडे
  • पांढरी माशी


शेंगा पोखरणारी हिरवी अळी
      पतंग शरीराने दणकट असून पिवळसर तपकिरी रंगाचा असतो. पुढील तपकिरी पंखजोडीवर काळे ठिपके असतात तर मागील पंखाच्या कडा धुरकट रंगाच्या असतात. अळी पोपटी रंगाची असली तरी विविध रंगछटा असलेल्या अळयाही दृष्टीस पडतात. त्याच्या शरीराच्या बाजुवर तुटक तुटक रंगाच्या उभ्या रेषा आढळतात. लहान अळी कोवळी पाने खाते. पीक फुलोरावर आल्यानंतर कळया, फुले व नंतर शेंगांना अनियमित आकाराचे मोठे छिद्र पाडून आंत शिरते. तिचे अर्धे शरीर आंत व अर्धे शरीर बाहेर असून शेंगातील अपरिपक्व तसेच परीपक्व यांच्यावर प्रादुर्भाव करते.
उंटअळी
      पतंग आकराने लहान व त्याचे पुढील पंख मळकट पिवळसर असतात. अळी नाजुक फिकट हिरव्या रंगाची व सडपातळ शरिराची असते. लहान अळया पानाचा खालचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानाचा फक्त वरचा पांढरा पापुद्रा दिसतो. अळी मोठी झाल्यावर पानांना छिद्र पाडून खाते. मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास झाडाची संपूर्ण पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवतात.


पाने खाणारी सोटअळी
      पतंग मोठा, गर्द, करडया रंगाचा असून पोटाचा भाग पिवळसर असून त्यावर काळे पट्टे असतात. अळी मोठी, रंगाने फिकट हिरवी असून त्यावर आठ पिवळे पट्टे असतात. अळया पाने कुरतुडून खातात. त्यामुळे झाडे पर्णहीन होऊन पिकाची अतोनात नासाडी होते.
मावा
      मावा मृदु शरीराचा, अर्धगोलाकार, प्रौढ अवस्था 2 मि. मी. लांब व रंगाने चमकदार हिरवट काळया रंगाचा असतो. ­याचदा पंख असलेला मावाही आढळून येतो. पिल्यावस्था ही प्रौढ अवस्थेप्रमाणेच परंतु आकाराने लहान असते. पानाच्या मागील भागावर राहून पानातील रस शोषण करते. त्यामुळे पाने आकसात. माव्याच्या पाठीवरील दोन शेंगामधून चिकट गोड स्त्राव पानांवर पसरतो व त्यावर काळया बुरशीची वाढ होते. प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते.



तंबाखुवरील पाने खाणारी अळी
      पूर्ण वाढ झालेली अळी हिरवट तपकिरी रंगाची, गुळगुळीत असून पाठीवर कडेने काळे त्रिकोणी ठिपके असतात. लहान अळया सुरवातीस समुहाने राहतात व पानाच्या खालचा भाग खरवडून खातात. मोठया अळया विखरुन एकएकटया पानावर मोठे छिद्र पाडून खातात.
तुडतुडे
प्रौढ व पिल्ले पानाच्या पेशीतील रस शोषण करतात व त्याचवेळी त्यांच्या शरीरावरील विषारी द्रव पानाच्या पेशीत सोडतात. परिणामत: पाने फिक्कट पिवळी पडून सुकतात व तांबडी पडतात. किडग्रस्त पाने खालच्या बाजूस आकसतात.
पांढरी माशी
      पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषण करतात. ही कीड तिच्या शरीरावाटे पानांवर चिकट गोड पदार्थ सोडते. त्यावर काळया बुरशीची वाढ होवून प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते आणि वाढ खंुटते. मुगामध्ये पांढरी माशी "येलो मोझॅक व्हायरस" या रोगाचा प्रसार करते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन
  • पीक काढणीनंतर खोल नांगरट करावी.
  • पिकांचे अवशेष/धसकटे गोळा करुन नष्ट करावीत म्हणजे किडीच्या सुप्तावस्थाचा नायनाट होईल.
  • आजुबाजूच्या बांधावरील द्विदलवर्गीय तणांचा नाश करावा म्हणजे मुख्य पीक नसताना किडीच्या अवस्था यांचे जीवनचक्र नष्ट होईल.
  • शिफारस केलेल्या अंतरावरच लागवड करावी म्हणजे आंतरमशागत तसेच किडीचे नियंत्रण करणे सोईचे होते.
  • मुग उडीदाच्या चार ओळीनंतर एक ओळ ज्वारीची पेरणी करावी. जेणेकरून त्याचा पक्षीथांबे म्हणून उपयोग होईल. तसेच  किंडीचा प्रसार होण्यास अटकाव होईल.
रासायनिक पध्दती
कीड
कीटकनाशक
प्रमाण/ 10 लिटर
शेंगा पोखरणारी अळी
थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा
15 ग्रॅम
क्लोरॅट्रानीलीप्रोल 18.5 एससी किंवा
2 मिली
फ्ल्युबेंडामईड 39.35 एससी किंवा
2 मिली
ल्युफेन्युरॉन 5.4 ईसी किंवा
12 मिली
पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी सोट अळी
क्विनालफॉस 25 ईसी
30 मिली
मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी
फोरेट 10 जी
15 कि./हे.


                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पैसा / वाणू  (मिलिपीड) व्यवस्थापन